मुंबई ता १७, संतोष पडवळ :– पश्चिम रेल्वेनंतर आता मध्य रेल्वेवरही एसी लोकल धावणार आहे. उद्यापासून प्रयोगित तत्वावर १० लोकल गाड्या धावणार आहेत. याबाबतचं सविस्तर वेळापत्रकच मध्य रेल्वेने जाहीर केले आहे.
मध्य रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या मार्गावर सध्याच्या सेवेऐवजी उद्यापासून १० वातानुकुलीत लोकल रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. सोमवार ते शनिवार या दिवशीच या गाड्या धावणार असून प्रत्येक स्थानकात त्या थांबतील. तसेच रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाने परवानगी दिलेल्या प्रवाशांनाच या मार्गावरुन प्रवास करता येणार आहे. दरम्यान, प्रवासादरम्यान करोनाच्या सर्व नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने प्रवाशांना केले आहे.