ठाणे

वाहतूक पोलिसाला मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी बाप लेकीवर गुन्हा दाखल.

 कल्याण ता १७, संतोष पडवळ : विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन समोर शहर वाहतूक शाखेकडून वाहनांची पाहणी व कारवाई सुरु होती. या कारवाईदरम्यान वाहन परवाना व कागदपत्र सोबत नसल्यामुळे ऑनलाईन चलन वाहनधारकास देण्यात आले होते. चलन दिल्याचा राग आल्याने वाहतूक पोलिसाला मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी बाप लेकीवर विठ्ठलवाडी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर वाहतूक शाखा उपविभाग विठ्ठलवाडी येथे कार्यरत असलेले वाहतूक पोलीस गणेश चौधरी हे विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन समोर कर्तव्यावर होते. रस्त्यावर वाहनांची पाहणी व कायदेशीर कारवाई करण्याचे काम ते करत होते. दरम्यान अ‍ॅक्टिव्हा दुचाकीवर आलेल्या मनोज गुरुनानी यांच्याकडे वाहनाशी संबंधीत कागदपत्र जवळ नव्हते. त्यामुळे सातशे रुपयाचे ऑनलाईन चलन त्यांना देण्यात आले.

या कायदेशीर प्रक्रियेने गुरनानी व त्यांच्या सोबत असलेली त्यांची मुलगी संतप्त झाली. गेल्या आठवड्यात आपल्या भावाला देखील चलन दिल्याचे सांगत त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याशिवाय पोलीस नाईक चौधरी यांना मारहाण करण्यात आली. पोलीस कर्मचारी किरण धांडे व पोलीस मित्र स्वप्नील जाधव असे दोघे यावेळी हजर होते. विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला मनोज गुरनानी व डिंकी गुरुनानी यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरु आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!