डोंबिवली ( शंकर जाधव ) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांचा त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील विकास कामांबाबत जगता पहारा असुन ते कामांची प्रत्यक्ष पाहणी करीत आहेत. मागील आठवड्यांत त्यांनी गांधीनगर येथील दुर्लक्षित रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर आमदार पाटील यांनी निवासी विभागातील विकास कामांची पाहणी केली. संबंधित ठेकेदार रस्त्याच्या कामात हेळसांड करीत असल्याने आमदार पाटील यांनी ठेकेदाराला मनसे स्टाईलने दम दिला.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात येणाऱ्या डोंबिवलीतील काही भागात अर्धवट व रखडलेली विकासकामे आहेत.मनसे आमदार राजू पाटील यांनी एमआयडीसी निवासी विभागातील सुरू असलेल्या रस्त्यांची व शेजारील गटारांच्या कामांची स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन व त्यांच्या तक्रारीनुसार पाहणी केली. गेले पाच-सहा महिन्यापासून कामे संथगतीने सुरु आहे. ठेकेदार हा त्या कामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे सांगत आमदार राजू पाटील यांनी मनसे स्टाईलमध्ये संबंधित ठेकेदाराला पंधरा दिवसांची मुदत दिली. अन्यथा त्या गटारातच तुला झोपविन असा सज्जड दम दिला आहे.