मनसेचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर ठिय्या आंदोलन
चंद्रावर पाणी मिळत, पण अंबरनाथकरांना पाणी नाहीच
पाण्यासाठी अंबरनाथच्या महिलांचा आक्रोश
अंबरनाथ दि. २१ (नवाज अब्दुलसत्तार वणू) : अंबरनाथ मधील जुने अंबरनाथ गाव आणि पाले गाव परिसरात मोठं मोठे गृहसंकुलांची कामे करण्यात आली आहे.या परिसरात नागरी संख्या देखील झपाट्याने वाढत आहे.मात्र राहिवश्यांना आवश्य असणाऱ्या सुखसुविधा देण्यात प्रशासकीय यंत्रणा अपयशी ठरली आहे. सतत पाठपुरावा करून देखील हक्काचे पाणी मिळत नसल्याने सोमवारी मनसेने अंबरनाथ जीवन प्राधिकरण कार्यालवर मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध केला आहे.
अंबरनाथ मधील जुने अंबरनाथ गाव तसेच पालेगाव परिसरात शासनाने पाण्यासाठी मोठे जलकुंभ तयार केले आहे. या जलकुंभाच काम होऊन तिने वर्षाचा कालावधी लोटला आहे.मात्र या गावांना पाणीच मिळालं नसल्याने सतत राहिवाश्यांनी पाठपुरावे सुरू केले आहेत.मात्र प्रशासकीय यंत्रणांकडून तीन वर्षे तारखाच मिळत असल्याने मनसेने सोमवारी हंडा कळशी डोक्यावर घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय गाठून यंत्रणेचा निषेध केला आहे.
मनसेचे शहर अध्यक्ष कुणाल भोईर यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी स्व.राकेश पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय पाटील ,मनसेचे अविनाश सुरसें सर, संदीप लकडे, शिवनाथ पाटील यांसह महिला आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रहिवाश्यांची पाणी समस्या तातडीने सोडवण्यासाठी अधिकाऱ्यानं कळशी देखील भेट देऊन निवेदन देण्यात आले आहे. मनसेने दहा दिवसांचा कालावधी प्रशासकीय यंत्रणांना दिले आहे, अन्यथा टाकीसजवळच उपोषण करणार असल्याचे इशारा देण्यात आला आहे.