ठाणे

कोपरी येथील जुन्या कापड मार्केटवर महापालिकेची धडक कारवाई ; 2 ट्रक माल जप्त..अनधिकृत बांधकामांवरही महापालिकेचा हातोडा.

ठाणे ( २१ ) : ठाण्यातील कोपरी पूर्व येथे भरणाऱ्या जुन्या कापड मार्केटवर आज ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने धडक कारवाई करून कापड विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली. ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिलेल्या आदेशानुसार सदरची कारवाई करण्यात येवून जुना कापड मार्केट येथून 2 ट्रक कापड माल जप्त करण्यात आले आहे. दरम्यान कोपरी वसाहतीमागील अनधिकृत वाढीव बांधकामही अतिक्रमण विभागाच्यावतीने निष्कासित करण्यात आले.

ठाणे पूर्वेला स्थानकापासून काही अंतरावर अनधिकृतपणे भरण्यात येणाऱ्या जुन्या कपडयांचा बाजारामुळे विक्रते व ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून रेल्वे स्थानकापासून तसेच कोपरी परिसरातील ये – जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नौपाड़ा – कोपरी प्रभागात भाजी मार्केट, कापड मार्केट, अवैध फेरीवाले तसेच दुकानांमध्ये सामाजिक अंतर नियमांचा भंग केला जात असल्याने ठाणे महापालिका आयुक्त डॉ . विपिन शर्मा यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याबाबत महासभेमध्येही चर्चा झाली होती.

या अनुषंगाने आज कोपरी पूर्व येथे भरणाऱ्या जुन्या कापड मार्केटवर धडक कारवाई करून 2 ट्रक कापड माल जप्त करण्यात आला. तसेच नौपाड़ा – कोपरी प्रभाग समिती आणि अतिक्रमण विभागाच्यावतीने गावदेवी मार्केट, गोखले रोड, स्टेशन रोड, सॅटीस, जांभळी नाका, राम मारुती रोड जवळील अवैध फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली.

नौपाडा कोपरी प्रभाग समितीमधील कोपरी वसाहत येथे अनधिकृत वाढीव बांधकाम करण्यात आले होते. हे संपूर्ण बांधकाम आज अतिक्रमण विभागाच्यावतीने निष्कासित करण्यात आले.

सध्यस्थितीत एकाच ठिकाणी गर्दी केल्याने कोरोनाच्या संसर्ग होण्याची शक्यता आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तसेच परिसरातील नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी महापालिकेच्यावतीने आज कारवाई करण्यात आली आहे.

सदरची कारवाई परिमंडळ उप आयुक्त संदीप माळवी तसेच अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी अतिक्रमण विभागाच्यावतीने पोलीस बंदोबस्तात केली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!