मतदार नोंदणी साठी साबे येथे विशेष अभियान सुरू
दिवा:-दिवा शहरात परिवर्तन हवे असेल तर येथे स्थायिक झालेल्या नागरिकांनी आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करणे गरजेचे असून नागरिकांना नवीन नोंदणी करताना अडचण येऊ नये यासाठी आपण नवीन मतदार नोंदणी अभियान राबवत असल्याचे भाजपचे निलेश पाटील यांनी म्हटले आहे.
भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष व दिवा शीळ विभागाच्या महिला मोर्चा अध्यक्षा सौ अर्चना पाटील यांच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी नव मतदार नोंदणी अभियान राबविले जात आहे.
दिवा शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे मात्र या शहराचे जबाबदार नागरिक म्हणून तरुणांनी आपली मतदार नोंदणी वेळेत करावी यासाठी भाजपा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष निलेश पाटील यांच्या पुढाकाराने दिव्यात साबे गाव येथे भाजपा कार्यालयात नवीन मतदार नोंदणी व मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण मोहीम राबवली जात आहे.जास्तीतजास्त नागरिकांनी दिवा शहराच्या विकासासाठी येथील मतदार होणे गरजेचे आहे असे मत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
ज्या नागरिकांना आपले नाव मतदार यादीत नोंद करायचे आहे त्यांनी निलेश पाटील यांच्या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन पाटील यांनी केले असून नागरिकांना संपूर्ण सहकार्य केले जाईल असे त्यांनी म्हटले आहे.