डोंबिवली ( शंकर जाधव ) : केडीएमसी परिवहन समितीचे माजी सदस्य तथा डोंबिवली मनसेचे शहर संघटक प्रल्हाद म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष तथा डोंबिवली विभाग सचिव गणेश कदम ह्यांच्या वतीने केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील रुग्णांना आणि कर्मचारी वर्गाना फळे वाटप करण्यात आले. यावेळी मनविसेचे जिल्हा संघटक वेदप्रकाश पांडे, विभाग अध्यक्ष हर्षद देशमुख, शाखाध्यक्ष महेश पांचाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
मनसे पदाधिकारी प्रल्हाद म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप
December 28, 2020
63 Views
1 Min Read

-
Share This!