ठाणे

डोंबिवली शहर काँगेस कमिटी ‘बी’ ब्लॉक पूर्व विभाग उपाध्यक्ष प्रणव संतोष केणे यांच्या पुढाकाराने आयरे परिसरात बालकांसाठी मोफत लसीकरण शिबीर

डोंबिवलीः डोंबिवली शहर काँगेस कमिटी ‘बी’ ब्लॉक पूर्व विभाग उपाध्यक्ष प्रणव संतोष केणे यांच्या पुढाकाराने आयरे परिसरात बालकांसाठी मोफत लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराचा शेकडो बालकांनी लाभ घेतला. साईनाथ झोपडपट्टी, न्यू आयरे रोड, डोंबिवली पूर्व या ठिकाणी या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबीरात 6 आठवडे ते 14 आठवडे आणि 9 महिन्यांपासून ते 16 वर्षापर्यंतच्या बालकांना मोफत लस देण्यात आली. विविध प्रकारच्या लसींचा समावेश होता. कल्याण — डोंबिवली महापालिका मढवी आरोग्य केंद्र यांच्या सहकार्याने हे शिबीर पार पडले.

या शिबीरात आरोग्य केंद्रातील डॉ. मेघनाथ मगर, दिपाली दांडकर, वैभव वसोनार, डॉ. पौर्णिमा हर्षल ढाके, किर्ती जोशी, अर्चना गलांडे, राजमल गवळी, रिंकू विरघट, उज्वला घोट, आश्विनी हिवाळे, स्नेहल इटाले, रुपाली गिम, निलम पठारे, सुजाता कोळवणकर, मनस्वी कदम, समीक्षा पालशेकर, पल्लवी आवाळे, प्रगती गोडबोले, प्रकाश कोळी, विक्रम कदम, मनोज भोगे, अनिल धुळप, आकाश दाभोळकर, जॉन फर्नांडीस, कल्पना वाघ या डॉक्टरांच्या टीमचे तर आशा वर्कर चंद्रकला मनवर, कविता मुंगळे, अनुजा दाभोळकर, सोनू खंदारे, सीमा राणे जैस्वाल, मालती बडगुजर आदींचे सहकार्य केले.

About the author

Aapale Shahar News

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!