नवी मुंबई

नवीमुंबईत भाजपा नगरसेविकेसह माजी नगरसेवकाने घेतला राष्ट्रवादीचा झेंडा : गणेश नाईकाना धक्का.!

नवी मुंबई, ता ५, संतोष पडवळ – नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय वारे वाहू लागले आहेत. नवी मुंबईत शिवसेनेनंतर राष्ट्रवादीनेही भाजपाला जोरदार धक्का दिला आहे. भाजपा नगरसेविकेसह माजी नगरसेवकाने राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. भाजपा नगरसेविका दिव्या गायकवाड आणि माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

दिव्या गायकवाड या प्रभाग क्रमांक 64मधून नगरसेवकपदी निवडून आल्या होत्या. तर राष्ट्रवादीचे तत्कालीन नेते गणेश नाईक यांच्यासह गायकवाडांनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र आता गायकवाड दाम्पत्याने राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे. दरम्यान, वैभव गायकवाड यांना 2010मध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली होती. तर 2015 मध्ये दिव्या गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. दोन्ही वेळा दोघेही मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. तर आता आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुका शरद पवार यांच्या नेतृत्वात लढण्याची घोषणा गायकवाड पती-पत्नीने केली आहे.

नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये गळती सुरुच आहे. विशेष म्हणजे गणेश नाईक यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या आठवड्यातच नाईक समर्थक असलेले भाजपाचे तीन नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले होते. नवीन गवते, दीपा गवते आणि अपर्णा गवते या नगरसेवकांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत हाती शिवबंधन बांधले होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!