ठाणे :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावत असताना कुटुंबाला स्वतः पासून दूर ठेवलं आहे. अनेक पोलीस बंधू – भगिनी कोरोना काळापासून एक दिवस देखील सुट्टी न घेता कर्तव्यावर हजर आहेत. त्यातच आता 31 डिसेंबर व नविन वर्ष साजरा करण्यासाठी अनेक जण घराबाहेर पडत होते यामुळे कुठे गैरप्रकार घडू नयेत यासाठी पोलीसांचा जागता पहारा सुरू होता.

पहारा करणाऱ्या पोलीस बांधवाना श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान मार्फत राजेप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटक श्री अशोक शिगवण,ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री.नवनाथ बाबा आहिरे व मनसे दिवा विभाग अध्यक्ष श्री.तुषार पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा उपसचिव सयाजी चव्हाण यांच्या संकल्पनेतून आज ०५ जानेवारी रोजी फळे वाटप करण्यात आले