ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र
ठाणे दि.05 : वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन यांच्या २०२० च्या पुस्तका मध्ये कराटेपटू रोहित भोरे यांची नोंद झाली आहे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
सन २०१८ व २०१९ वर्षा मध्ये ५००० पेक्षा अधिक बृहन्मुंबई महानगर पालिका (बी.एम.सी) मॅनिंग मोपिंग स्वछता कामगारांना फिटनेस, नैराश्य व चिंतामुक्त, नशा मुक्ती, सेल्फ डिफेन्स, योग्य आहार करीता दिलेले प्रशिक्षण साठी त्याच बरोबर ८०० पेक्षा अधिक शालेय, महाविद्यालय मुलींना, अनाथ मुले मुलींना मोफत कराटे मार्शल आर्ट या कलेचे प्रशिक्षण दिल्या बदल तसेच कराटे या क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट असे राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय, आशिया, विश्व् व लिंमका बुक ऑफ रेकॉर्ड्स करून महाराष्ट्र राज्याचे व भारत देशाचे नाव कराटे क्रीडा प्रकारात उंचावल्या बदल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन यांनी २०२० च्या पुस्तका मध्ये रोहित भोरे यांच्या नावाची नोंद ही “कराटे एक्स्पर्ट” म्हणून केलेली आहे.