डोंबिवली ( शंकर जाधव ) : शिवसेना पदाधिकारी गोरखनाथ ( बाळा )म्हात्रे, अनमोल म्हात्रे आणि अश्विनी अनमोल म्हात्रे यांच्यावतीने डोंबिवली पश्चिमेकडील महाराष्ट्र नगर येथे १ रुपयात स्वस्त भाजी देण्यात आली. यावेळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. शिवसेना पदाधिकारी संदीप सामंत, मनोज वैद्य,राजकुमार म्हात्रे,विजय भोईर, अवि मानकर, अॅड.गणेश पाटील, दिलीप धनावडे, लक्ष्मण म्हात्रे,महेश तावडे यश अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेतली.लॉकडाऊन मध्ये बेरोजगारी वाढली असताना नागरिकांना १ रुपयात भाजी मिळत असल्याने त्यांनी शिवसेनेचे आभार मानले.
तर शिवसेना पदाधिकारी गोरखनाथ ( बाळा ) म्हात्रे यांनी यावेळी नागरिकांना मदत केल्याचे समाधान मिळत असल्याचे सांगितले. तर संदीप सामंत यांनी शिवसेना सदैव नागरिकांच्या मदतीला धावत असते.लॉकडाऊनमध्ये शिवसेनेने जनतेला आवश्यक ती मदत केली होती. शिवसेना पदाधिकारी गोरखनाथ ( बाळा )म्हात्रे, अनमोल म्हात्रे आणि अश्विनी अनमोल म्हात्रे यांच्या समाजकार्यामुळे नागरीका खुश आहेत.