ठाणे

दिव्यात सक्तीच्या मालमत्ता कर वसूली बाबत राष्ट्रवादीचे ठाणे मनपाच्या महसूल विभागाला निवेदन.

ठाणे /दिवा, ता ७, संतोष पडवळ : दिव्यात सक्तीच्या मालमत्ता कर वसूली बाबत राष्ट्रवादीचे ठाणे महानगर पालीकेच्या मालमत्ता विभागात निवेदन देण्यात आले. कोरोनाच्या काळामध्ये गेली ९ महिन्यापासून लोकल ट्रेन बंद असल्यामुळे व अनेकांचे रोजगार गेल्याने दिव्यातील सर्व सामान्य नागरीक बेजार झाल्याने आर्थिक परस्थितीमुळे त्रासलले आहे. त्यात अनेक लोकांचा काम धंदा बंद आहे . त्यांमुळे जनसामान्य जनता मानसीक दृष्ट्या फार खचलेले आहेत . तरी दिव्यामध्ये महसूल विभागाची सक्तीची करवसुली चालू आहे . त्यांमुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्मान झाले आहे . तरी आपल्या कडून ज्या पद्धतीने सक्तीची करवसुली केली जात आहे ती कार्यवाही सौम्य पद्धतीने करण्यात यांवी व ज्यांनी मालमत्ता कर भरला नसेल त्याना कर भरण्यासाठी काही कालावधी देऊन करवसूली करण्यात यावी असेही निवेदन देण्यात आले .

प्रसंगी राष्ट्रवादीच्या ज्योती पाटील व ज्योती चौरसियॉ (माहिला कार्याध्यक्षा) तसेच कल्पेशा नार्वेकर, दिपक मोहिते, परशुराम पाटील, पंढरीनाथ राउळ, सुनिल पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर कार्यकरते हजर होते

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!