ठाणे, ता ७, (संतोष पडवळ) : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा कार्यकारणी यांच्या वतीने जागतिक पत्रकार दिनानिमित्त काल दिनांक ६ जानेवारी २०२० रोजी पत्रकार दिन ठाण्यातील गडकरी रंगातनमध्ये साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम हा मा. पारसनाथ राय सर, आणि मा. अोमकार राजुरकर (कायदेशीर सल्लागार) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. तसेच कार्यक्रमाला मनोज शिंदे ( महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव ),कर्मवीर सुनिल खांबे ( रि.पा.ई. राष्ट्रीय संघटक ), डॉ. राजेश मढवी ( भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष ) , युवराज बांगर (तहसीलदार ठाणे), अधिक पाटील (तहसिलदार भिवंडी) आबा साहेब चासकर ( जेष्ठ संपादक ) या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात पत्रकारिता क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या पत्रकारांना सन्मानचिन्ह, शाल, तुळशीचे रोप देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच पत्रकार संघाचे सचिव मिलिंद दाभोळकर, सहसचिव ज्योती चिंदरकर, प्रमोद घोलप, संपर्कप्रमुख सतीशकुमार भावे, अतुल तिवारी, संघटक अखिलेश पाल, वृत्तवाहिनी प्रमुख संतोष पडवळ, मंगेश प्रभुळकर, अमित जाधव, शेखर आयर, गणेश गव्हाणे, प्रशांत मोठे, देवेंद्र वायकर, सुबोध कांबळे, देवेंद्र शिंदे, अमित गुजर, सुशांत संखे, रंजना जोगळेकर, लक्ष्मी पटेल, नितीन शिंदे आणि विकास पाटील तसेच न्युज मराठी बाणाचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते.
दरम्यान मान्यवरांनी पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले.