डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली शहरासाठी जेष्ठ नागरिकांचे खूप मोठे योगदान आहे. संस्कार व संकृतिकता जोपासणारे नावारूपाचे असे शहर आहे.नागरिकांना अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य राहील.अत्यंत गरजेचे वेळी १०० नंबरवर कॉल करून पोलीस प्रशासन आपल्या मदतीला धावून येईल. नागरिकांनी सर्तक रहा,पोलीस तुमच्या बरोबर आहे असे विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वपोनि संजय साबळे यांनी पश्चिमेकडील कान्होजी जेधे मैदान ( भागशाळा ) येथे पार पडलेल्या `पोलीस रेझींग डे सप्ताह २०२१` मध्ये सांगितले.
याप्रसंगी विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे,पोलीस उपनिरीक्षक कपिले, पोलीस हवालदार युवराज तायडे, विजय जाधव, राजेंद्र बनसोडे, भाजप डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष अध्यक्ष प्रदीप चौधरी, पश्चिम मंडळ सरचिटणीस समीर चिटणीस,जेष्ठ नागरिक संघ अध्यक्ष कमलाकर जकातदार ,माजी नगरसेविका रेखा आसोदेकर,पवन पाटील, भाजप ज्येष्ठ कार्यकर्ते गोकुळ अमृतकर आदि मान्यवर उपस्थित होते. भाजप डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष भाजप प्रदीप चौधरी आपल्या भाषणात पोलीस प्रशासनाने कोरोना काळातील नागरिकांना केलेले सहकार्य आम्ही विसरू शकणार नाही असे सांगितले.
सामाजिकतेच्या कार्यात विष्णुनगर पोलीस प्रशासन नागरिकांना चांगल्या प्रकारे मदत व मार्गदर्शन करीत असतात.आपण नाहक त्या आमिषाला बळी पडत असल्यामुळे वाईट गोष्टी समाजात घडत असतात.वाईट प्रवृत्तीला खत पाणी न घालता वेळीच आपली सतर्कता हेच आजच्या दिवसाचे फलित राहील असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर पाटील यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेश म्हात्रे, सुरेश जोश, चित्रे, दातखिळे, ऋषभ ठाकर यांनी सहकार्य केले.