ठाणे

कल्याण शीळ मार्गावर पाईपलाईन फुटल्याने पूरसदृष्य परिस्थिती

ठाणे – कल्याण शीळ मार्गावरील डोंबिवली नजिक असलेल्या देसाई गावच्या हद्दीत बारवी धरणातून येणारी औद्योगिक महामंडळाची मुख्य पाईपलाईन फुटली. ही घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. शिवाय, कल्याण शीळ मार्गाला अक्षरशः पूरसदृश्य परिस्थिती निमार्ण झाल्याने मार्गाच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.

या जलवाहिनीद्वारे बदलापूरच्या बारवी धरणातून ठाणे महानगरपालिका व डोंबिवलीतील काही भागात पाणी पुरवठा होतो. जलवाहिनी फुटल्याने अचानक तिचे पाणी प्रचंड वेगाने रस्त्यावर आले. त्यामुळे, रस्त्याची एक बाजू रात्री उशिरापर्यंत बंद होती. त्यामुळे, या रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली. या पाईपलाईनद्वारे दिवा, मुंब्रा, कळवा या ठिकाणी पाणी पुरवठा होत होता. पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी नेमका किती वेळ लागेल, हे अधिकृतरित्या अद्याप एमआयडीसीकडून सांगण्यात आलेले नाही. तोपर्यंत या ठिकाणचा पाणी पुरवठा बंद असणार आहे.

दरम्यान, जलवाहिनी फुटल्यामुळे आज दिवसभर डोंबिवली एमआयडीसी फेज एक, फेज दोन, एमआयडीसी निवासी विभाग, डोंबिवलीतील ग्रामपंचायती, तसेच केडीएमसी क्षेत्राला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती एमआयडीसीच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्याने दिली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!