ठाणे दि.12: भारतीय संविधान आपल्या जगण्याचा आधार आहे असे विधान कार्याध्यक्ष सामाजिक कृतज्ञता निधी सचिव एस एम जोशी सोशालिस्ट फाऊंडेशनचे सुभाष वारे यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा कल्याण यांनी संविधान बांधिलकी महोत्सव फेसबुक लाईव्ह आयोजित कार्यक्रमात केले.
सदर कार्यक्रम हा फेसबुक लाईव्ह पेजवर प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमाचे स्वरूप संवादात्मक होते.सुभाष वारे सरांनी संविधान हे आपल्या जगण्याचा आधार कसा आहे , हे अनेक उदाहरणे, वेगवेगळी कलमे, आणि संदर्भ सांगून पटवून दिले. वारे सरांच्या संवादाची शैली ही अत्यंत अभ्यासपूर्ण, विस्तृत, विनयशील, मैत्रीपूर्ण होती. सुभाष वारे सरांशी संवाद साधण्यासाठी राजेश देवरुखकर, शरद लोखंडे, सुशील माळी, कल्पना बोंबे, तानाजी सत्वधीर, परेश काठे इत्यादी अंनिसचे कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच फेसबुक पेजवर वरील कार्यक्रम लाईव्ह बघणाऱ्या प्रेक्षकांनी comment बॉक्स मध्ये लाईव्ह प्रश्न विचारले त्यानाही उत्तम पद्धतीने उत्तरे देऊन वारे सरांनी संवाद साधला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रेकॉरडेड गाणे सादर करून कार्यक्रमात रंगत आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन राजेश देवरुखकर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम हा उत्तमरीत्या पार पडला.