जयंतीच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक गोष्टीसाठी आम्ही एकत्रित राहू म्हणून घेतली शपथ
अंबरनाथ दि. १२ (नवाज अब्दुलसत्तार वणू) : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अवघ्या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती सर्वत्र साजरी करण्यात आली. अशाप्रकारे आज राष्ट्रवादी काँग्रेस अंबरनाथ शहर व राष्ट्रवादी महिला काँग्रेस अंबरनाथ शहराच्या वतीने ही जयंतीनिमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथ पूर्वेकडील सदाशिव (मामा) पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील व महिला अंबरनाथ शहराध्यक्षा पूनम विनोद शेलार यांनी केले होते. राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा विद्याताई वेखंडे, अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, शिवाजीनगरचे पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोंगे, प्रदेश सरचिटणीस सुभाष पिसाळ, महिला प्रदेश सरचिटणीस प्रिसीला डिसिल्वा, जिल्हा सरचिटणीस नीलिमा नायडू उपस्थित होते. आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान महाराष्ट्राचे आम्ही नागरिक असून जन्माला आलेल्या मुली, मुले व आम्ही सर्वांसाठी सामाजिक, सांस्कृतिक गोष्टीसाठी आम्ही एकत्रित राहू व सामाजिक कार्य आम्ही सदैव करत राहू, अशी शपथ माता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त घेण्यात आली.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील, समाजसेविका आशा पाटील, महिला शहराध्यक्ष पूनम शेलार, वृषाली पाटील, स्वाती पवार, शोभा मोरे, शहनाज शेख, शहनाज कुरेशी, जुलेखा सय्यद, स्नेहल कांबळे, सरिता सिंग, मीनल भाटकर, योगिता गायकवाड, कमलाकर सूर्यवंशी, धनंजय सुर्वे, युवक अध्यक्ष प्रमोद बोराडे, विधानसभा अध्यक्ष गणेश गायकवाड, विनोद शेलार, भगवान महाजन, संजय बन्सल, कृष्णा पाटील, रवी शिंदे, इम्रान खान, वामसी कृष्णा यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.