महाराष्ट्र

दिव्यांग प्रमाणपत्र प्रक्रिया सुलभ, गतिशील करणार – राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर

मुंबई, दि. 14 : राज्यातील दिव्यांग प्रमाणपत्र प्रक्रिया अधिक सुलभ, गतिशील करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले. राज्यातील दिव्यांग प्रमाणपत्र प्रक्रियेत काळानुरूप सुधारणा आणि बदल आवश्यक असून त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

मंत्रालय येथे जिल्हास्तरावर निर्गमित करण्यात येणाऱ्या दिव्यांग प्रमाणपत्राच्या कार्यपद्धतीत सुधारणा करणे आणि तालुकास्तरावर दिव्यांगांसाठी सुविधा उपलब्ध करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसचिव हृषीकेश मोडक, आरोग्य सेवा संचालनालय सहसंचालक डॉ.नितिन अंबाडेकर, वैद्यकीय शिक्षण उपसचिव प्र. ब. सुरवसे, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले उपस्थित होते.

दिव्यांगांच्या प्रमाणपत्रासाठी प्रतिक्षायादीत वाढ न होता, त्यांच्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी नियोजन करावे. त्यांच्यासाठीच्या शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी त्यांचा प्राधान्याने विचार करावा. दिव्यांग प्रमाणपत्र प्रक्रियेत काळानुरूप सुधारणा आणि बदल करावेत. याबाबत त्यांच्याकडून सूचना मागविण्यात याव्यात असे राज्यमंत्र्यांनी सांगितले.

About the author

Aapale Shahar News

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!