डोंबिवली ( शंकर जाधव ) : शनिवारपासून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत लसीकर्णास सुरु झाली. कल्याण डोंबिवली महापालिकमध्ये कोविशिल्ड लसाची सहा हजार डोस आले. महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी प्रथम लस टोचून घेतली.तर डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉ. संतोष केंभव्ही यांनी प्रथम लस घेतली. कल्याणणधील शक्तीधाम विलगीकरण केंद्रामध्ये डॉ. संदीप निंबाळकर यांनी लसीचा पहिला डोस घेतला. दिवसभरात १०० लोकांना लस देण्यात आली.
लस दिल्यानंतर सर्व कर्मचारी टाळ्य़ा वाजवून लस टोचून घेणा:याचे कौतुक करीत होते.लस दिल्यानंतर डॉक्टरांकडून सूचना देण्यात आल्या. महापालिकेने लस टोचण्यासाठी कल्याण पश्चिमेतील रुकमीणीबाई रूग्णालय, शक्तीधाम क्वारन्टाईन सेंटर, कल्याण पूर्व आणि डोंबिवलीतील शास्त्रीनगर रूग्णालय येथे कोविड लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. रूक्मीणीबाई रूग्णालयात महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचे शुभारंभ करण्यात आले लस दिल्यानंतर आरोग्य कर्मचा:यांना निरीक्षण कक्षेत पाहणी कक्षात अर्धा तास बसविण्यात येत होते. लसीचा कोणततीही रीएक्ष्ण होत नाही याची पाहणी करण्यात आली. लस देणा:या पारिचारिका लस टोचून घेतल्यानंतर कोणाताही त्रस झाल्यानंतर आरोग्य केंद्राशी संपर्क साधा असे सांगत होत्या.
डॉ. अश्विनी पाटील, प्रशांत पाटील, र क्मीणीबाई रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पुरूषोत्तम टिके यांनी लस टोचून घेतली.