डोंबिवली ( शंकर जाधव ) : एकीकडे अंबरनाथ बदलापूर दरम्यान रेल्वे रुळाच्या दुरुस्ती करताना असताना दुरुस्ती करणारी मशीन मध्ये बिघाड झाल्याने झालेल्या अपघातात एक कामगाराचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले त्यामुळ बदलापूर ते आंबरनाथ रेल्वे सेवा ठप्प झाली तर मध्य रेल्वे विस्कळीत झाले होती .
त्यापाठोपाठ पुन्हा दुपारी बाराच्या सुमारास कल्याण ठाकुर्ली दरम्यान रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या झाडे झुडपं जेसीबीच्या साहाय्याने काढण्याचे काम सुरू होते याच दरम्यान कल्याणच्या दिशेने असलेल्या रुळावर हा जेसीबी अडकला.त्यामुळे सुमारे अर्धा तास रेल्वे सेवा विस्कळीत झाली. रेल्वे प्रशासनाने तातडीने धाव घेत जेसीबी हटवून रेल्वे रूळा ची तपासणी करत रेल्वे सेवा सुरू केली मात्र तरीही डोंबिवली कडून कल्याण कडे जाणारी धीम्या मार्गावरील वाहतूक तबबल अर्धा तास ठप्प झाली होती. यामुळे प्रवाशांचे मात्र हाल झाले