ठाणे,ता 29, संतोष पडवळ :- कोरोना या महाभयंकर रोगाचा सर्वसामान्यच्या जीवनावर खूप मोठा परिणाम झाला त्याचा प्रत्येय महाराष्ट्रातील पोलिसांवर देखील झाला शेकडो पोलीस शाहिद झाले आणि अजून देखील काही पोलीस कोरोना च्या विळख्यात सापडले आहेत.
ठाणे जिल्ह्यातील ७५ शाहिद पोलीस कोरोना योध्याच्या वारसांना आज ठाणे जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाने महाराष्ट्राचे नवनियुक्त पोलीस महासंचालक मा.श्री.हेमत नगराळे साहेब, यांच्या हस्ते अनुकम्पा तत्त्वावर नोकरीवर सामावून घेत नियुक्ती पत्र बहाल केले.नियुक्ती पत्र घेताना अनेक शाहिद पोलीस पत्नी यांच्या डोळ्यात अश्रू आले.श्री. नगराळे साहेब देखील भारावून गेले आणि पुढे स्पष्ट केले की ठाणे जिल्ह्यातील शाहिद पोलिसांच्या वारसांना नियुक्ती देताना हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे तो उत्कृष्ट व चांगल्या पद्धतीने पार पडला पुढे ही ठण्यात कार्यक्रमांना मी आवर्जून उपस्थित राहील असे सांगितले.
कार्यक्रमा चे आयोजन ठाणे जिल्ह्यातील पोलीस आयुक्त मा. श्री. विवेक फनसाळकर साहेब व अतिरिक्त पोलीस आयुक्त मेकाला साहेब यानी साकेत गार्डन येथे केले होते.