सीबीएसई बोर्डचे सचिव अनुराग त्रिपाटी यांच्याहस्ते देण्यात आला पुरस्कार
शिक्षिका पिंकी अय्यर व ज्योती नायर यांना “शिक्षा गौरव पुरस्कार”, तर शोभा दास यांना “शिक्षा रत्न पुरस्कारा”ने सन्मानित
अंबरनाथ दि. ०२ (नवाज अब्दुलसत्तार वणू) : अंबरनाथमधील इंफॅन्ट जेसीस स्कुलला सेंटर ऑफ एज्युकेशन डेव्हलपमेंट (सीईडी) या संस्थेने “ए फाइव्ह स्टार रेटिंग, प्रोग्रेसिव्ह स्कुल अवॉर्ड” या अत्यंत प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार सीबीएसई बोर्ड, नवी दिल्लीचे सचिव अनुराग त्रिपाटी यांच्याहस्ते शाळेच्या डायरेक्टर दीपा एडविन यांना दि. २७ जानेवारी २०२१ रोजी “द हॉटेल लीला अंबियन्स, नवी दिल्ली येथे आयोजित पुरस्कार सोहळा देण्यात आला आहे.
पूर्वेकडील रॉयल पार्क परिसरात सी.बी.एस.सी बोर्डाची इंफॅन्ट जेसीस स्कुल असून या शाळेला यावर्षी सीइडी फाउंडेशन तर्फे आपल्या देशात असलेल्या सी.बी.एस.सी बोर्डाच्या शाळांमध्ये “फाइव्ह स्टार रेटिंग” ने नुकतंच गुडगाव येथे एका कार्यक्रमात बोर्डाचे सेक्रेटरी अनुराग त्रिपाठी यांच्याहस्ते शाळेच्या डायरेक्टर दीपा एडविन यांना देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच या शाळेतील शिक्षिका पिंकी अय्यर यांना “शिक्षा गौरव पुरस्कार”, ज्योती नायर यांना “शिक्षा गौरव पुरस्कार” आणि शोभा दास यांना “शिक्षा रत्न पुरस्कारा”ने गौरविण्यात आले असून “फाइव्ह स्टार रेटिंग”साठी बोर्डा तर्फे अकरा निकष लावण्यात आले होते आणि या निकषात या शाळेने अग्रक्रम मिळाल्याने हि रेटिंग देण्यात आली आहे, ही रेटिंग इफन्ट जेसीस स्कुलला मिळाल्याने शिक्षक आणि शाळा प्रशासनाचे सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यानिमित्ताने आज इंफॅन्ट जेसीस स्कुलमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला अंबरनाथ नगरपरिषद शिक्षण मंडळाचे केंद्र समन्वयक शेषमल राठोड, शाळेच्या डायरेक्टर दीपा एडविन, संस्थेचे विश्वस्त एडविन सर, मुख्याध्यापिका शांती राव, उपमुख्याध्यापिका श्रावणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराचे सरचिटणीस अजयराव चिरीवेल्ला यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.