ठाणे

राज्यस्तरीय सातव्या ’अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेत नातं जिंकले ठाण्यातील प्रसाद थोरवेने मिळवला उत्कृष्ट अभिनेता, दिग्दर्शकाचा बहुमान

ठाणे, दि. 2 : राज्यस्तरीय सातव्या ’अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेत ठाण्याच्या व्हाइट लाइटची एकांकिका  नातं ने  मानाचा अटल करंडक पटकाविला.  तर ठाण्यातील चंदनवाडी परिसरात राहणारा सुधागड तालुक्यातील तरुण कलाकार प्रसाद थोरवे याने या राज्यस्तरीय स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रथम क्रमांक, सवोर्र्त्कृष्ठ लेखक, दिग्दर्शन तृतीय क्रमांक व सर्वोत्कृष्ठ लेखक व एकांकिका (‘नात’ व्हाइटलाईज)प्रथम क्रमांक पटकावल्याने त्याचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष व पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवार 31 जानेवारी रोजी सायंकाळी शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडला. या  समारंभाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर  होते  प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध नाटककार, साहित्यिक आणि 99 व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी उपस्थित होते.


 यावेळी   खूप सुंदर आयोजन, सगळ्या गोष्टीची काळजी घेतली होती. सगळं वेळेत होते घाई गडबड नव्हती. थेटरला लागणारे साहित्य आम्हाला आयोजकांनी पुरवले होते कोव्हिड नंतर करे तर खूप  कठीण होते इथे येऊन प्रयोग करणे पण आयोजकांनी सुनाड, अप्रतिम आयोजन केल्याने सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या जर दुसरी कडे स्पर्धा असती आणि अशा प्रकारे आयोजन नसते तर आम्ही सांगू शकत नाही की प्रयोग करू शकलो असतो. आम्ही काही सुध्दा आणले नव्हते  सगळ्या गोष्टी आम्ही इथे आलो, इथल्या घेतल्या आणि प्रयोग करून आता बक्षीस सुध्दा घेऊन चाललो, अशी प्रतिक्रिया ‘नात’ व्हाइटलाईज एकांकीकेचा अभिनेता, दिग्दर्शक  प्रसाद थोरवे याने दिली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!