ठळक वैशिष्ट्ये
• इलेक्सिस अँटि-सार्स-कोव्ही-२ एस व्यक्तीमधील रोगप्रतिकार प्रतिसाद (इम्युन रिस्पॉन्स) मोजते आणि सार्स-कोव्ही-२च्या एक्स्पोजरची स्थिती ठरवते
• ही चाचणी स्पाइक प्रोटिनविरोधातील अँटिबॉडीजना लक्ष्य करते आणि लशीने उत्तेजित केलेल्या इम्युन रिस्पॉन्सची वैशिष्ट्ये ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते
• मॉडेर्नाच्या एम-आरएनए लस चाचण्यांमध्ये इलेक्सिस अँटि-सार्स-कोव्ही-टू एस चाचणीचा समावेश आहे. लशीमुळे मिळालेले संरक्षण व प्रतिपिंडांची पातळी यांच्यातील सहसंबंधाचे मूल्यांकन करण्यासाठी ही चाचणी वापरली जात आहे
• इलेक्सिस अँटि-सार्स-कोव्ही-२ एस चाचणी जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांची२ उत्तमरित्या पूर्तता करते
मुंबई: 4 फेब्रुवारी 2021 : रोश डायग्नोस्टिक्स इंडियाने सार्स-कोव्ही-२ अँटिबॉडी चाचणी- इलेक्सिस अँटि-सार्स-कोव्ही-२ एस लाँच केल्याची घोषणा केली आहे. ही चाचणी सीई आयव्हीडीने मंजूर केलेली असून, तिला भारतात आयसीएमआर आणि सीडीएससीओची मान्यताही मिळाली आहे. ही एक इन विट्रो चाचणी असून, मानवी सीरम व प्लाझमा यांच्यातील स्पाइक (एस) प्रोटिन सार्स-कोव्ही-टूच्या रिसेप्टर-बाइंडिंग डोमेन अर्थात आरबीडीविरोधातील अॅटिबॉडीजचे मापन करण्यासोबत विषाणूविरोधात शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीच्या प्रतिकारात्मक क्षमतेचे मापन करते.
मानवी शरीरातील पेशीमध्ये विषाणूचा प्रवेश होण्यासाठी कारणीभूत असलेल्या मानवी पेशीच्या रिसेप्टरला बांधायला साह्य करणा-या विषाणूजन्य स्पाइक प्रोटिनच्या विशिष्ट क्षेत्राविरोधात निर्देशित अँटिबॉडीज हे इलेक्सिस अँटि-सार्स-कोव्ही-२ एस चाचणीचे लक्ष्य असते.3 सध्याच्या बहुसंख्य लशींचे (मान्यताप्राप्त आणि विकासाच्या टप्प्यातील) उद्दिष्ट व्हायरल स्पाइक प्रोटिनविरोधात अँटिबॉडी प्रतिसाद उत्पन्न करणे हेच आहे.
रोश डायग्नोस्टिक्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र वर्दे म्हणाले, “कोविड साथीशी लढण्यात देशाला मदत करण्यासाठी खात्रीशीर, उच्च दर्जाच्या चाचण्या पुरवण्यासाठी रोश वचनबद्ध आहे. नवीनतम अँटिबॉडी सोल्युशन इलेक्सिस अँटि-सार्स-कोव्ही-टू एस केवळ ‘पॉझिटिव’ किंवा ‘निगेटिव’ असा परिणाम देणार नाही, तर रक्तामध्ये सार्स-कोव्ही-टू संबंधित अँटीबॉडीजचे प्रमाण निर्धारित करण्यासाठी संख्यात्मक माहिती देखील देईल. यामुळे आरोग्यसेवा यंत्रणा व रुग्णांना कोविड-१९ विरोधातील लढ्यामध्ये सहाय्य मिळू शकेल.”
रोश डायग्नोस्टिक्स इंडियामधील मेडिकल आणि सायंटिफिक अफेअर्स विभागाचे प्रमुख डॉ. संदीप सेवलीकर भारतामध्ये अँटिबॉडी चाचण्या कशा गरजेच्या आहेत हे स्पष्ट करताना म्हणाले: “पीसीआरसह निदान झाल्याचे १४ दिवस किंवा नंतर चाचणीमध्ये ९९.९८ टक्के (एन=५९९१) उच्च क्लिनिकल स्पेसिफिसिटी आणि ९८.८ टक्के (एन=१४२३) उच्च सेन्सिटीव्हीटी आहे. या चाचणीची निष्पत्ती अँटिबॉडी केंद्रीकरणाच्या (यू/मिली) स्वरूपात दिली जाते. इलेक्सिस अँटि-सार्स-कोव्ही-२ एस चाचणीतील एककांचे डब्ल्यूएचओच्या आंतरराष्ट्रीय मानकांशी सर्वोत्तम सहसंबंध आहेत किंवा असल्याचे मानले जाऊ शकते.2”
लशीच्या चाचण्यांमध्ये, लस दिली जाण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीमध्ये असलेल्या अँटीबॉडीजची सुरूवातीची पातळी जाणून घेणे विशेषत: एसएआरएस-कोव्ही-२ स्पाइक प्रोटीनच्या विरूद्ध निर्देशित अँटीबॉडीज तयार होण्यासंदर्भात अँटीबॉडीच्या पातळीतील कोणत्याही बदलांचे मूल्यांकन करणे फायदेशीर ठरेल. या अँटिबॉडीजमध्ये गुणकारी विषाणूविरोधी हालचाली दिसून आल्या आहेत आणि याचा संबंध संभाव्य रोगप्रतिकाराशी आहे.4
इलेक्सिस अँटि-सार्स-कोव्ही-२ एस अँटिबॉडी चाचणीचा एम-आरएनए-१२७३ लस संशोधन चाचण्यांमध्ये उपयोग करण्याच्या उद्देशाने जागतिक स्तरावर रोश डायग्नोस्टिक्सने मॉडेर्नाशी भागीदारी केली आहे. लशीने निर्माण केलेले संरक्षण व अँटिबॉडीजचा स्तर यांच्यातील सहसंबंध प्रस्थापित करण्यासाठी ही चाचणी मॉडेर्नाला उपयुक्त ठरेल.
लशीच्या परिणामकारकतेच्या मूल्यमापनासोबतच, इलेक्सिस अँटि-सार्स-कोव्ही-टू एस सेरोलॉजी चाचणी प्लाझमाफेरेसिस दानातील अँटिबॉडींचा स्तर निश्चित करण्यासाठी तसेच सेरोप्रिव्हेलन्सचा अंदाज बांधण्यासाठी वापरली जाऊ शकते.
इलेक्सिस अँटि-सार्स-कोव्ही-२ एस इम्युनो चाचणी रोशच्या विस्तृतरिच्या उपलब्ध कोबास इ अॅनालायजर्सवर चालवली जाते आणि या पूर्णपणे स्वयंचलित तंत्र सार्स-कोव्ही-टू चाचणीचा निकाल एका चाचणीसाठी सुमारे १८ मिनिटांत देऊ शकतात. यात चाचणीचे थ्रूपुट (विशिष्ट कालावधीत प्रक्रिया करून तयार केलेले उत्पादन) विश्लेषकाच्या क्षमतेनुसार प्रतितास ३०० चाचण्यांपर्यंत जाऊ शकते.5
आरोग्यसेवा प्रणालींना कोविड-१९ विरोधात लढण्यासाठी मदत करणाऱ्या रोशच्या सर्वसमावेशक निदानात्मक मोलेक्युलर व सिरॉलॉजी पोर्टफोलिओमध्ये या चाचणीची भर पडली आहे.
सर्व ट्रेडमार्क्स आणि ट्रेडनेम्स ही संबंधित मालकाची मालमत्ता आहे.
इलेक्सिस आणि कोबास हे रोशचे ट्रेडमार्क्स आहेत.
संदर्भ
१. झेडएचयू एफसी आणि अन्य (२०२०). द लॅन्सेट ३९६:४७९- ४८८२)
२. रोश डेटा ऑन फाइल
३. हॉफमान, मार्कस आणि अन्य (२०२०). सेल. ८१ (२):२७१:२८० इ८;
४. मास्टर्स पीएस (२००६). द मोलेक्युलर बायोलॉजी ऑफ कोरोनाव्हायरस. अॅडव्हान्सेस इन व्हायरस रिसर्च. अकॅडमिक प्रेस ६६:१९३-२९२;
५. रोश इम्युनोअसे सिस्टम्सचे संपूर्ण तपशील, थ्रूपुटसह, आमच्या diagnostics. roche या वेबसाइटवर बघितले