राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याहस्ते करून घेण्यात आला प्रवेश
अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती
अंबरनाथ दि. ०९ (नवाज अब्दुलसत्तार वणू): अंबरनाथमधील काँग्रेसच्या तीन माजी नगरसेवकांसह अन्य दोन जणांनी काँगेसच्या हाताची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातावर बांधले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याहस्ते सोमवारी मुंबई येथील प्रदेश कार्यालयात त्यांच्या प्रवेश सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या तीन माजी नगरसेवकांसह अन्य दोन जणांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे. अशी माहिती मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील व सरचिटणीस धनंजय सुर्वे यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्रुती सिंग, ठाणे जिल्हा सचिव तथा माजी नगरसेवक प्रकाश पाटील, जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगरसेवक नरेंद्र काळे, माजी युवक अध्यक्ष मनोज सिंग आणि सरचिटणीस दिपक दबडे या पाच जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा शहराध्यक्ष तथा माजी खासदार आनंद परांजपे व अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील आदींच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसला रामराम ठोकला आहे. राष्ट्रवादीची ध्येय धोरणे आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यपद्धतीमुळेच पक्ष प्रवेश केल्याचे यावेळी सांगण्यात आले.पवार यांच्या कार्यावर व पक्षाच्या ध्येय धोरणांवर विश्वास ठेवून तीन माजी नगरसेवकांसह अन्य दोन जणांनी राष्ट्रवादीत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याहस्ते जाहीर प्रवेश केलेला आहे. चार शिलेदारांनी जो राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे, त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद दुप्पटीने वाढेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील यांनी व्यक्त करत येणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी ५७ च्या ५७ जागा लढवणार असून ज्या जागा निवडून येतील त्यावर जास्त भर दिला जाणार असल्याचेही शहराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील, सरचिटणीस धनंजय सुर्वे, अजयराव चिरीवेल्ला, कबीर गायकवाड, कमलाकर सूर्यवंशी, सोशल मीडिया सेल अध्यक्ष मिलींद मोरे आदी उपस्थित होते.