ठाणे : ठाणे जिल्ह्यातील पिंपरीगाव येथील केदारेश्वर मंदिरातील दानपेटीतील 40,000/- ते 50,000/- रुपये चोरी करणाऱ्या आरोपींना व दुसऱ्या केस मध्ये रिक्षामधील प्रवाशांना लुटणाऱ्या तिन आरोपींना शिळ डायघर पोलिसांनी मोठ्या सीताफीने अटक केली आहे,फेब्रुवारी दिनांक 4 ते 5 तारखेच्या दरम्यान सकाळी 5 च्या सुमारास ठाणे जिल्ह्यातील पिंपरी गाव येथील केदारेश्वर मंदिरातील मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून दानपेटीतील 40 हजार ते 50 हजार रुपये कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी केल्याचा गुन्हा शिळ डायघर पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाला होता.
त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे,पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड, सहाय्यक पोलीस आयुक्त निता पाडवी मॅडम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप सरफरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कापडणीस,सहाय्यक पोलीस निरीक्षक नाना मोरे, पोलीस हवालदार मोहिते, पोलीस नाईक वाकडे, पोलीस नाईक जाधव, पोलीस नाईक आहेर, पोलीस नाईक गायकर, पोलीस नाईक वसावे, पोलीस नाईक आव्हाड, पोलीस नाईक पाटील, पोलीस नाईक भामरे, पोलीस कॉनस्टेबल सपकाळे, पोलीस कॉनस्टेबल बोराडे, पोलीस कॉनस्टेबल सोनवणे, पोलीस कॉनस्टेबल बरफ, पोलीस कॉनस्टेबल समाधान माळी यांनी घटनास्थळ ते तळोजा खारघर परिसरातील 30 सी सी टीव्ही कॅमेरा तपासणी करून व तांत्रिक तपास करून कोपरगाव सेक्टर 10, खारघर जिल्हा रायगड शरीफ शफिकूल शेख वय 25, मोहम्मद हुसेन यासिन मुल्ला वय 28, याना 5/2/2021 तारखेला 9:24 वाजता अटक करण्यात आली.
या आरोपिंकडून 46,670/-रोख रक्कम, दानपेटी, घरफोडीची हत्यारे, व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तसेच दुसऱ्या प्रकरणात रिक्षातून कल्याण शिळफाटा येथून कळंबोली बस स्टॉप येथे जात असताना रिक्षा मध्ये बसलेल्या अन्य दोन प्रवाशी यांनी रिक्षा चालक यांचेशी संगनमत करून रिक्षात बसलेल्या फिर्यादी यांना हाताने मारहाण करून त्यांच्या कडील लॅपटॉप, मोबाईल पॉवर बँक, रोख रक्कम असा 28,000/- मुद्देमाल जबरदस्ती चोरी करून, फिर्यादी याला निर्जन स्थळी सोडून पळून गेले, शिळडायघर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून मोहम्मद हयात इब्राहिम उर्फ मम्मू सय्यद वय 30 राहणार अमृतनगर मुंब्रा, मुस्तफा उर्फ मुस्तु हमीद पावसकर वय 37राहणार श्रीलंका मुंब्रा, मुज्जमील उर्फ गुड्डू उर्फ हॉरर जासीम शेख वय 24 राहणार अमृत नगर मुंब्रा यांना 4/2/2021रोजी अटक केली व त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरी केलेला लॅपटॉप, पॉवर बँक, आधारकार्ड व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा 65,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, हे आरोपी चोरी करणारे सराईत गुन्हेगार असून मोहम्मद हयात उर्फ मम्मू इब्राहिम सय्यद याच्यावर मुंब्रामध्ये पांच आणि लडगंज नांदेड येथे एक असे सहा गुन्हे दाखल आहेत, तर मुस्तफा उर्फ मुस्ती हमीद पावसकर याच्यावर मुलुंड पोलीस स्टेशन मध्ये चार तर चारकोप व मुंब्रा पोलीस स्टेशन मध्ये एक एक असे सहा गुन्हे दाखल आहेत.
या आरोपिंकडून अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पोलीस अधिक तपास करत आहेत.