डोंबिवली ( शंकर जाधव ) : नगरविकास मंत्री, सार्वजनिक बांधकाम ( उपक्रम ) मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे विभागप्रमुख अमोल पाटील यांच्या पुढाकाराने डोंबिवली पूर्वेकडील ग्रोग्रासवाडी येथील संत नामदेव पथावरील दि लिटील स्टार नर्सरी स्कूलमध्ये रेशनकार्ड शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, तात्या माने यांच्या हस्ते करण्यात आले.शिबिरात शिधावाटप निरीक्षक संतोष मात्रे,मंगेश जवंजाळ आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी किशन धोंगडे यांनी शिबिरात नागरिकांना रेशनकार्ड काढून दिले. अर्ज वितरण,रेशनकार्ड,आधारकार्ड लिंक,पत्ता बदल करणे,नवीन रेशनकार्ड बनवणे, नाव कमी करणे किंवा अश्यांवर मार्गदर्शन देऊन त्यांच्या रेशनकार्डात बदल करून देण्यात आले. डोंबिवली पूर्वेकडील शिधावाटप कार्यालयाच्या हद्दीत केशरी शिधापत्रिकाधारक एक लाख तर पीएचच शिधापत्रिकाधारक ३२ हजार आहे.तर १०८ शिधावाटप दुकाने आहेत.
विभागप्रमुख अमोल पाटील म्हणाले,पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या शिबिरात नागरिकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यालयप्रमुख सतीश मोडक, महिला शहर संघटक मंगला सुळे,विभागीय कार्यालयप्रमुख दशरथ चहान, उपविभागप्रमुख मंगेश मोरे,शाखाप्रमुख समीर फाळके, आमोद वैद्य,संजय मांजरेकर,राजेश कदम,सागर जेधे, दीपक भोसले, विभागसंघटक प्रतिभा शिरोडकर, उपविभागसंघटक नंदणी पोळ,भारती कदम,शाखासंघटक साधना माळवी,चित्रा झवेरी,हेमा मानगुटकर,सुंनद शेवाळे,स्मिता पालव, माया कुराडे आणि शानभाग आदी उपस्थित होते.