डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली पूर्वेतील प्रभाग क्र. ७७ दत्तनगर परिसरात मोफत नेत्रतपासणी शिबीर पार पडले. आज दि.१०.०२.२०२१ रोजी शिबीरातील रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. कॉंग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे यांच्या हस्ते चष्मे वाटप करण्यात आले.
डोंबिवली पूर्व बी ब्लॉक उपाध्यक्ष प्रणव केणे यांनी जुना आयरे रोड परिसरातील नागेश्वर नवनाथ ध्यान मंदिर शेजारील मैदानात शिबीराचे आयोजन केले होते.