ठाणे

व्ही.जी.एन ज्वेलर्समध्ये भिसीत गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसेचे मोर्चा

डोंबिवली ( शंकर  जाधव ) : भिसी हि योजना सामान्य नागरिकांसाठी महत्वाची असल्याने गुतंवणूक करतात.मात्र आपले पैसे ठरलेल्या वेळेत परत मिळत नसल्याने अश्या नागरिकांनी मनसेकडे धाव घेतली.लॉकडाऊनमध्ये नागरिकांची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने त्याच्यांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी मनसेने गुरुवारी डोंबिवली पूर्वेकडील टिळक पुतळ्याजवळील व्ही.जी.एन ज्वेलर्सवर मोर्चा काढला.या मोर्च्यात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

   व्ही.जी.एन ज्वेलर्सवर विश्वास ठेवून विविध योजनांद्वारे भिसीतून अनेक डोंबिवलीकरांनी गुतंवणूक केली होती.काही जणांनी हजारो तर काही जणांनी लाखो रुपये गुंतवले.मात्र गुंतवणूक केलेली रक्कम आणि त्यावरील व्याज अशी रक्कम ठरलेल्या वेळेत परत मिळत नसल्याने व्ही.जी.एन ज्वेलर्सकडे या नागरिकांनी वारंवार हेलपाटे मारूनहि त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने त्यांनी मनसेकडे आपली व्यथा मांडली.गुरुवारी मनसेने व्ही.जी.एन ज्वेलर्सवर मोर्चा काढला.या मोर्च्यात नागरिक सहभागी झाल्याने कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.यावेळी मनसेचे जिल्हाअध्यक्ष प्रकाश भोईर,डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज घरत, शहर संघटक अमित सुलाखे,,माजी नगरसेवक मनोज राजे,राहुल चितळे,प्रल्हाद म्हात्रे, कदम भोईर न पाडगावकर,शाखा अध्यक्ष कदम भोईर, संदीप ( रमा ) म्हात्रे, विराज मडवी, सागर मुळे,महिला पदाधिकारी दीपिका पेंडणेकर,सुमेधा थत्ते, प्रतिभा पाटील,स्वप्ना पाटील यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोर्च्यात सहभागी झाले होते.

यावेळी व्ही.जी.एन ज्वेलर्सचे मालक वी.जे.नायर यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन भिसी गुतंवणूक केलेल्या नागरिकांचे पैसे परत करू असे आश्वासन दिले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!