ठाणे (ता १२, संतोष पडवळ ) : ठाणे महानगरपालिका हद्दीतील सर्व खाजगी रुग्णालयांच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर महापालिकेच्या अग्नीशमन दलाने शहरातील ३४७ खाजगी रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेची तपासणी केली. या तपासणीअंती जवळपास २८ रूग्णालये बंद असल्याचे आढळून आले तर जवळपास 111 रुग्णालयांनी आपल्या अग्निसुरक्षा परीक्षणाचा अहवाल सादर केला आहे.
ठाणे शहरात रुग्णालयांतील अग्निसुरक्षेत दृष्टीने सर्व खाजगी रुग्णालयाच्या इमारतीतील अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण (फायर ऑडिट) करण्याची सक्ती ठाणे महापालिकेने केली असून परीक्षणाचा अहवाल सादर न केल्यास कारवाई करण्याचा ईशारा महापालिकेने दिला आहे. खाजगी रुग्णालयांच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेचा परीक्षण अहवाल सादर न केल्यास व्यावसायिक आस्थापना चालविण्यासाठी आवश्यक असलेले अन्य परवाने दिले जाणार नसल्याचे महापालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून एकून ३४७ रूग्णालयांची यादी अग्नीशामन विभागास प्राप्त झाली होती. या रूग्णालयांच्या अग्नीसुरक्षेची पाहणी करण्यासाठी पथके तयार करून त्यानुसार सर्व रूग्णालयांची तपासणी करण्यात आली. यामध्ये मुंब्रा व शीळ अग्निशमन केंद्र अंतर्गत 43 रुग्णालये, जवाहरबाग अग्निशमन केंद्र 120 रुग्णालये , वागळे अग्निशमन केंद्र 59 रुग्णालये, कोपरी अग्निशमन केंद्र 6 रुग्णालये, पाचपाखाडी अग्निशमन केंद्र 55 रुग्णालये आणि बाळकूम अग्निशमन केंद्र 64 रुग्णालये अशी एकूण 347 खाजगी रुग्णालयांची नोंद झाली आहे. यामधील 28 हॉस्पिटलबंद असून 318 रुग्णालयांच्या अग्नीसुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यात आली.
दरम्यान 318 पैकी एकूण 111 रुग्णालयांनी आपला अहवाल सादर केला आहे. उर्वरीत रुग्णालयांना 22 फेब्रुवारी, 202 पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.Attachments area