मुंबई, दि. १५ :- “सुखकर्ता, विघ्नहर्ता श्री गणरायांना माघी गणेशजयंतीच्या निमित्तानं भावपूर्ण वंदन करतो. श्री गणरायांनी राज्यावरचे, देशावरचे कोरोनाचे संकट दूर करावे. सर्वांना स्वच्छंद फिरता येईल, असे कोरोनामुक्त वातावरण पुन्हा निर्माण व्हावे. महाराष्ट्राची सर्व क्षेत्रात भरभराट व्हावी. जनतेच्या जीवनातील दू:ख दूर होऊन प्रत्येकजण सुखी, समाधानी, आनंदी व्हावा, अशी प्रार्थना मी श्री गणरायांच्या चरणी करतो. आपल्या सर्वांना माघी गणेश जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा देतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. माघी गणेश जयंती साजरी करताना कोरोना प्रतिबंधक नियमांचे तसेच आरोग्य विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
माघी गणेश जयंतीनिमित्त श्री गणरायांना वंदन; उपमुख्यमंत्र्यांकडून माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा
February 15, 2021
15 Views
1 Min Read

-
Share This!