ठाणे

वॉर्ड क्र. २६ मध्ये माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या पुढाकाराने “भव्य रेशनकार्ड शिबीराला” सुरुवात

हनुमान मंदिर, बुवापाडा येथे १५ व १६ फेब्रुवारी या दोन दिवसांसाठी रेशनकार्ड शिबीर

शिबिराला स्थानिक नागरिकांसह इतर विभागातील नागरिकांचा वाढता प्रतिसाद

अंबरनाथ दि. १५ (नवाज अब्दुलसत्तार वणू) : अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांच्या पुढाकाराने तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतुन व शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नवनिकेतन सेवा मंडळ, ओमकार मित्र मंडळ, महालक्ष्मी महिला मंडळ आणि श्री गुरू विरू पाक्षेश्वर मठ, नवनिकेतन बॉईज यांच्या मदतीने अंबरनाथच्या पश्चिम भागातील भेंडीपाडा, बुवापाडा वार्ड क्रमांक २६ येथे दोन दिवसीय “भव्य रेशनकार्ड शिबिर” आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरा दरम्यान स्थानिक तसेच इतर विभागातील नागरिकांना नविन शिधापत्रिका मिळण्यासाठी, शिधापत्रिकेतील पत्ता बदल करण्यासाठी, शिधापत्रिकेतील नाव वाढविण्यासाठी, दुय्यम शिधापत्रिका मिळण्यासाठी, शिधापत्रिकेतील नाव कमी करण्यासाठी या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकेतील तरतुदी करण्यासाठी अधिकृत सरकारी अधिकाऱ्यांकडून मदत करण्यात येत आहे. या शिबिराचा लाभ पहिल्या दिवशी ७५० पेक्षा जास्त नागरिकांनी घेत उपस्थिती लावली. शिबिरात आलेल्या सर्व नागरिकांना हवी ती मदत मिळते आहे याची खात्री खुद्द राजेंद्र वाळेकर हे स्वतः उपस्थित राहून करत आहेत. तसेच नागरिकांच्या इतर समस्यांबाबत देखील राजेंद्र वाळेकर यांनी नागरिकांसोबत चर्चा केली आणि लवकरात लवकर त्यांवर उपाय करू असा विश्वास दिला. 

            या शिबिरादरम्यान माजी उपनगराध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांच्या सोबत शिवसेनेचे माजी नगरसेवक उत्तम आयवळे, निखिल वाळेकर, संदीप भराडे इतर पदाधिकारी, स्थानिक पदाधिकारी, महिला आघाडी सदस्य, युवासेना पदाधिकारी तसेच मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!