ठाणे

शेतकऱ्यांन घेतले तब्बल तीस कोटींचे हेलिकॉप्टर तर हेलिप्याड शेतात..!

 भिवंडी : भिवंडी  तालुक्यात गोदाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकसित झाला आहे. त्यातून या भागात बरीच आर्थिक सुबत्ता आली आहे. अगदी ग्रामीण भागातही मर्सिडीज, फॉर्च्युनर, बीएमडब्ल्यू, रेंजरोव्हर अशा कार मोठ्या प्रमाणात आढळतात.एवढंच काय, तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यात वापरली जाणारी कॅडिलॅक ही कार भारतात सर्वप्रथम खरेदी करण्याचा बहुमान भिवंडी तालुक्यातील दिवे अंजूर इथल्या अरुण आर पाटील यांच्या खात्यावर जमा झालेला आहे. हा आगरी समाजातील उद्योजक आहे. हे असं असतानाच भिवंडी तालुक्यातील वडपे या गावात राहणारे मूळचे शेतकरी असलेले जनार्दन भोईर यांनी आता चक्क 30 कोटी रुपयांचं हेलिकॉप्टर  खरेदी करण्याचं ठरवलं आहे.

भोईर हे शेतकरी  आहेत आणि जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. घरी गाडी, बंगला आणि आर्थिक सुबत्ता असताना जनार्दन भोईर  यांनी बांधकाम व्यवसायात  सोबतच काही विकासकांना  जमीन विकसित करायला दिली. यातून त्यांच्याकडे बरीच आर्थिक सुबत्ता आली.

भोईर यांना स्वतःला दुग्ध व्यवसायासाठी  सतत पंजाब, हरियाणा, गुजरात या भागात जावं लागतं. यातून त्यांनी हेलिकॉप्टर घेण्याचा निर्णय घेतला. त्यांचं नऊ आसनी हेलिकॉप्टर 15 मार्च रोजी त्यांना मिळणार आहे. त्यांच्या जागेवर हेलिकॉप्टरसाठी नक्की काय व्यवस्था आहे हे पाहण्यास आज मुंबईहून  काही तंत्रज्ञ हेलिकॉप्टर घेऊन वडपे गावात आले होते.त्याठिकाणी अडीच एकर जागेवर संरक्षक भिंतीसह हेलिपॅड, हेलिकॉप्टर ठेवण्यासाठी गॅरेज, पायलट,  इंजिनियर, सुरक्षारक्षक यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे.

विशेष म्हणजे, आज गावात उतरलेल्या हेलिकॉप्टरमध्ये जनार्दन भोईर स्वतः बसले नाहीत. त्यांनी नुकतेच गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्य मंडळींसह गावातील आपल्या जवळच्या मित्र मंडळींना फेरफटका मारून आणला.

About the author

Aapale Shahar News

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!