महाराष्ट्र

अन्न व औषध प्रशासनाच्या छाप्यात दीड कोटी रुपयांचा खाद्यतेल साठा जप्त

मुंबई, दि. १७ : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने नुकतेच मुंबई व पालघर  परिसरातील अनेक ठिकाणी  छापे टाकले असून चार खाद्यतेल रिपॅकर्स व घाऊकविक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.  सर्व ठिकाणी मिळून एकूण १ कोटी ६० लाख २६ हजार २५९ रुपयांचा खाद्य तेलाचा साठा जप्त करण्यात आला व एकूण ४० खाद्यतेलाचे नमुने विश्लेषणार्थ घेण्यात आले.

राज्यातील जनतेच्या आरोग्याची जबाबदारी हे प्राधान्य लक्षात घेवून, त्यांच्या दैनंदिन आहारातील अन्न पदार्थाचा दर्जा तपासण्याची जाणीव लक्षात ठेवून प्रशासनास प्राप्त होणाऱ्या गोपनीय माहितीच्या आधारे छापे टाकण्याची कार्यवाही करण्यात येते.

राज्यातील अन्न व्यवसायाचा दर्जा उंचावणे तसेच अन्न व्यावसायिकांना अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या तरतुदींचे पालन करण्यासाठी मार्गदर्शन करणे हा देखील या छाप्यांचा हेतू असतो.

मुंबई  आणि पालघर परिसरातील काही खाद्यतेल व्यावसायिकांवर नुकतेच छापे घालण्यात आले.

या छाप्यात मुंबई परिसरातील 1) मे. ऑईल वेल ऑईल सेंटर, लोटस कॉलनी, गोवंडी, मुंबई-43  2) मे. जि.के.ऑईल सेंटर, जि.एम.लिंक रोड, गोवंडी, मुंबई -43 व पालघर जिल्ह्यातील 3) मे. ओमकार  ट्रेडींग कंपनी, सातीवली, वसई, जि. पालघर, 4) मे. शिवाय ट्रेडींग कपंनी, सातीवली, वसई पूर्व, जि. पालघर या चार खाद्यतेल उत्पादक व रिपॅकर्स यांच्यावर कारवाई घेण्यात आली.

धाडीचा उद्देश व परिणाम तपासता यावा म्हणून प्रथम प्राधान्याने विश्लेषण अहवाल मागवण्यात आले. घेण्यात आलेल्या सर्व नमुन्यांचे विश्लेषण केले असता 40 नमुन्यांपैकी 28 नमुने प्रमाणित व 12 नमुने कमी दर्जाचे  असल्याचे आढळून आले आहेत.

एकूण घेतलेल्या शेंगदाणा तेलाच्या 06 नमुन्यापैकी 06 नमुने (100 टक्के)  कमी दर्जाचे असल्याचे आढळून आले. मोहरी तेलाच्या 11 नमुन्यापैकी 03 नमुने (27.27 टक्के) कमी दर्जाचे असल्याचे आढळून आले. सोयाबिन तेलाच्या 02 नमुन्यापैकी  02 नमुने (100  टक्के)  प्रमाणीत असल्याचे आढळून आले. सुर्यफुल तेलाच्या 02 नमुन्यापैकी  02 नमुने (100.00 टक्के)  कमी दर्जाचे असल्याचे आढळून आले. पामोलिन तेलाच्या 13  नमुन्यापैकी  01 नमुने (7.69 टक्के)  कमी दर्जाचे असल्याचे आढळून आले. कॉटनसिड तेलाच्या 02 नमुन्यापैकी 02 नमुने (100 टक्के)  प्रमाणित असल्याचे आढळून आले. राईस ब्रान तेलाच्या 04 नमुन्यापैकी  04  नमुने (100 टक्के)  प्रमाणित असल्याचे आढळून आले.

ही कारवाई श्री शशिकांत केकरे, सह आयुक्त (अन्न), बृहन्मुंबई  विभाग, अन्न व औषध प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

प्रमाणित आढळलेल्या खाद्य तेलाचा जप्तसाठा तात्काळ विक्रीसाठी खुला करण्याचे व अप्रमाणित नमुन्या बाबतीत कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश अन्न सुरक्षा आयुक्तांनी दिले आहेत.

नागरिकांना अन्न पदार्थाच्या किंवा औषधांच्या दर्जा विषयी काही श्ंका असल्यास प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक 1800222365 वर तक्रार करावी, असे आवाहन अन्न सुरक्षा आयुक्त यांनी केले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!