ठाणे

सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना तात्काळ निलंबित करा


भाजपा करणार पालिका मुख्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

ठाणे : ठाणे महानगरपालिकेतील स्थावर मालमत्ता अधीक्षक तथा दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश बाबुराव आहेर यांची पालिका सेवेतील कारकीर्द नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचार व मनमानी कारभाराचे अनेक आरोप करण्यात आले आहेत. सन २०१६ साली हप्ते वसुलीच्या आरोपाखाली त्यांना निलंबित देखील करण्यात आले होते. महेश आहेर यांची शैक्षणिक अहर्ता नसतानासुद्धा त्यांची पदोन्नती सर्व नियमांचे उल्लंघन करून करण्यात आली आहे. त्यांना स्थावर मालमत्ता अधीक्षक व सहाय्यक आयुक्त पदी चुकीच्या पद्धतीने नियुक्त करण्यात आले आहे.


महेश बाबुराव आहेर हे स्थावर मालमत्ता विभागात अधीक्षक असल्याने रस्तारुंदीकरणात बधितांसाठी असणाऱ्या घरांच्या व गाळ्यांच्या वाटपात देखील मोठा गैरव्यवहार त्यांच्या माध्यमातून झाला असल्याचे त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. तसेच बोगस लाभार्थी तयार करून त्यांना सदनिका वाटल्याप्रकरणात महेश आहेर यांच्यावर कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.


बेकायदेशीरपणे घरे व गाळे भाडेतत्वावर देण्याच्या प्रकरणात स्थावर मालमत्ता अधीक्षक जबाबदार असताना सुद्धा त्याच खात्यातील एका लिपिकाला अटक करण्यात आली होती. तसेच दिवा प्रभाग समिती मध्ये सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असताना अनेक अनधिकृत बांधकामे झाली व सुरू आहेत परंतु या देखील प्रकरणात लिपिकाला जबाबदार धरून त्याला निलंबित करण्यात आले आहे
महेश बाबुराव आहेर हे गुंड प्रवृत्तीचे अधिकारी असून कर्मचाऱ्यांना धमक्या व शिवीगाळ करणे तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देणे असे अनेक प्रकार समोर आले आहेत. दिवा प्रभाग समिती मधील कर्मचाऱ्याला धमकी देत असल्याचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. त्याचप्रमाणे जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दिवा येथील भाजप अधिकाऱ्याने नुकतीच पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.


आमची आपणास विनंती आहे की, अशा गुंड प्रवृत्तीच्या अधिकाऱ्याला व ज्यांची कोणतीही शैक्षणिक अहर्ता नसताना त्यांना स्थावर मालमत्ता अधीक्षक/सहाय्यक आयुक्त हे पदभार सांभाळणाऱ्या वादग्रस्त आणि भ्रष्ट अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करावे. अन्यथा सोमवार दिनांक २२/०२/२०२१ रोजी भारतीय जनता पार्टी दिवा विभागाच्यावतीने ठाणे महानगर पालिका मुख्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात असे पत्र आज भाजप दिवा विभागाच्या वतीने आयुक्तांना देण्यात आले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!