दिवा (बातमीदार)- दिवा शहरातील दिवा पूर्व स्टेशन ते दिवा टर्निंग येथील रस्ता रुंदीकरणाचे आयुक्त बिपिन शर्मा यांच्या आदेशानुसार दिव्यातील काही इमारतींवर तोडक कारवाई आज पासून सुरू झाली. तरी या कारवाईस स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला.
दिवा टर्निंग येथील श्री समर्थ कृपा इमारतीस पालिका तोडक कारवाईसाठी आली असता नागरिकांनी एकत्र येऊन विरोध केला. त्यामुळे तेथील कारवाई स्थगित करून दिवा स्थानकातील वारेकरांच्या इमारती पालिकेने आज कारवाई केली. त्या इमारतीचा तिसरा आणि चौथा मजला आज पाडण्यात आला.
आम्हाला दिव्यातच घरे हवीत. प्रत्येकाने गावची जमीन, दागिने आणि लोन काढून घरे १५ ते २० वर्षांपूर्वी घेतली आहे. तर आता पालिका आम्हाला देसले पा नेऊन टाकत आहे. तेथे काहीच सुविधा नसतानाही आम्हाला जबरदस्ती घर खाली करायला पालिका लावत आहे. आमचा या तोडक कारवाईला विरोध असून आम्ही ती करू देणार नाही.
अश्विनी गायकवाड, नागरिक –