डोंबिवली ( शंकर जाधव ) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नांदीवली येथील क्र.८०मधील माजी नगरसेवक राजन मराठे आणि नगरसेविका ज्योती राजन मराठे यांच्या पुढाकाराने प्रभागात मोफत आधार कार्ड शिबिराची सोय उपलब्ध करण्यात आली होती. या शिबिरात लाभ प्रभागातील शेकडो नागरिकांनी आणि महिलांनी घेतला.तीन दिवसीय शिबिरात सुकन्या योजनेचा लाभ महिलांना प्राप्त व्हावा याकरिता आधार कार्ड शिबीर आयोजित करण्यात आले.विविध कार्यालयात कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी सहाय्य करण्यात आले.नावात बदल, विवाहित महिलांसाठी गँझेट कापी, आडनाव बदल गँझेट कापी, शाळेच्या दाखल्यातील जन्मतारीखेत बदल करणे, लाईटबील, बँक पासबुक, रेशनकार्ड, मतदान कार्ड, अँग्रीमेंटयातील पत्यातील बदल लहान मुलांचे आधार नुतणीकरण करणे या सोयी एकाच शिबिरात उपलब्ध करुन देण्यात आल्या. यामुळे प्रभागातील नागरिकांचा दगदग आणि वेळ वाचला.या शिबिराचा अनेकांनि लाभ घेतला.
मनसेच्या वतीने एकता नगर येथे आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शिबीर
February 19, 2021
37 Views
1 Min Read

-
Share This!