महाराष्ट्र

दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईनच होणार

मुंबई ता 22, : दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. त्यामुळे आता दहावी, बारावीच्या विद्यार्थांना परीक्षा केंद्रावर जाऊन बोर्डाचा पेपर द्यावा लागणार आहे. सध्या ऑनलाईन परीक्षेस बोर्ड अनुकुल नसल्याचे समोर आले आहे. ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हीटीचा प्रश्न असल्याचे बोर्डाचे मत आहे. त्यामुळे आता दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. नियोजीत वेळापत्रकानुसार आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.

राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षा आणि प्रक्टिकल पुढच्या महिन्यांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने आढावा घेतला. त्यावेळेस ऑनलाईन परीक्षा घेऊन शकतो का? यावर चर्चा करण्यात आली. यादरम्यान बोर्डाने परीक्षा घेण्यासाठी आपण पूर्णपणे तयार झाल्याचे स्पष्ट केले. पण ऑनलाईन परीक्षा घेतली तर ग्रामीण विद्यार्थ्यांना याचा फटका बसू शकतो. कारण ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हीटीची समस्या आहे. त्यामुळे दहावी, बारावीची परीक्षा ही ऑफलाईनच होणार आणि परीक्षा केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार, अशी भूमिका बोर्डाने घेतली आहे.

गेल्या आठवड्यात दहावी आणि बारावीचे राज्य मंडळाने संभाव्य वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार बारावी बोर्डाची परीक्षा २३ एप्रिलपासून सुरू होणार असून दहावीची परीक्षा २९ एप्रिलला सुरू होणार आहे. दरम्यान, हे संभाव्य वेळापत्रक बोर्डाने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केले होते. पण अंतिम दहावी, बारावीच्या परीक्षांसंदर्भातला निर्णय पुढील आठवड्यात घेतला जाणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी (२० फेब्रुवारी)ला दिली होती.

About the author

Aapale Shahar News

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!