ठाणे

शिवसेनेच्या पुढाकाराने अनमोल नगरी येथे आरटीपीसीआर मोफत तपासणी

   डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण –डोंबिवली महानगरपालिकेच्या ठाकुर्ली नागरी आरोग्य केंद्राच्या सहकार्याने आणि समाजसेवक गोरखनाथ ( बाळा) म्हात्रे व युवा सेना उपशहर अधिकारी अनमोल म्हात्रे यांच्या पुढाकाराने डोंबिवली पश्चिमेकडील गरीबाचा वाडा येथील अनमोल नगरी येथील कार्यालयात आरटीपीसीआर मोफत तपासणी करण्यात आली.परिसरातील रिक्षाचालक आणि नागरिकांची थर्मल गनने ताप,आॅक्सिमीटरने आॅक्सिजन व पल्स तापसणी करण्यात आली.यावेळी ( बाळा) म्हात्रे व युवा सेना उपशहर अधिकारी अनमोल म्हात्रे,संदीप सामंत,अरविंद मानकर,मनोज वैद्य,रोहन मातेकर, आकाश अदन, राजा चव्हाण,परब,महेश तावडे,राजू सावंत,दिलीप धनावडे आदी उपस्थित होते.

पुढील गुरुवारी याच ठिकाणी आरटीपीसीआर मोफत तपासणी केली जाणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी आणि रिक्षाचालकांनी तपासणी करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!