ठाणे

अरेरावीची भाषा करणाऱ्या सहायक आयुक्त आहेर विरोधात दिवावासीय ठामपा आयुक्तांना पाठविणार 10 हजार पत्र


ठाणे : मागील काही दिवस दिवा शहरात प्रभाग समिती *सहायक आयुक्त महेश आहेर* यांचे दिव्यातील जनतेबाबत अरेरावी करत असल्याचे व्हिडीओ व्हायरल होत असून एक लोकसेवक मस्तवाल पणे अशी भाषा करत असेल तर त्याला तातडीने निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी दिव्यातील नागरिक 10 हजार पत्र पालिका आयुक्तांना पाठविणार आहेत.

एकीकडे दिवा शहराने अनेक समस्यांनी बकाल स्वरूप धारण केलेले असताना ज्या सहायक आयुक्तांवर शहराच्या विकासाची जबाबदारी आहे ते अरेरावीची भाषा करून दिवा वासीयांना कमी लेखत असतील,दिव्यातील लोकांना सरळ करायला आलोय अशी भाषा त्यांची असेल तर अशा अधिकाऱ्यांची हकालपट्टी करायला हवी अशी भूमिका दिव्यातील नागरिकांनी घेतली असून पालिका आयुक्तांच्या निदर्शनास संबंधित अधिकारी यांचे जनता विरोधी काम आणले जाणार आहे.

लोकशाही मध्ये अधिकारी हे लोकसेवक आहेत मात्र दिव्यात पाणी समस्या,रस्ते समस्या, गटारे,आरोग्य या सर्वच बाबतीत अडचणी असताना व त्यावर उपाययोजना करण्या ऐवजी हुकूमशाही वृत्तीचे प्रदर्शन महेश आहेर करणार असतील तर त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी दिवावासीयां मार्फत 10 हजार पत्र पालिका आयुक्तांना पाठवली जाणार आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!