डोंबिवली ( शंकर जाधव) : अनेक वर्षे डोंबिवलीतील समस्यांना सोडविण्यासाठी सदैव आपल्या लेखणीने प्रशासनाला जागे करणाऱ्या, अन्यायाला वाचा फोडणाऱ्या आणि कोरोना काळात काम करणाऱ्या डोंबिवली पत्रकार संघाला कोकण एकता प्रतिष्ठानचा डोंबिवली सन्मान २०२१ शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार सोहळा डोंबिवली पश्चिमेकडील एव्हरेस्ट सभागृहात पार पडला. खर तर पुरस्कार हा केलेल्या सामाजिक कार्याला मिळालेली शाबासकी असते.पत्रकार हे नेहमीच लेखणीतून आपले कर्तव्य बजावीत असतात.अश्यावेळी त्याच्या कार्याची दखल घेऊन अनेक सामाजिक संस्था त्यांना पुरस्कार प्रदान करून गौरवित असते.
डोंबिवली पत्रकार संघाला शौर्य पुरस्कार देऊन भाई पानवडीकर यांनी एकप्रकारे सर्व पत्रकारांचे कौतुक केले आहे.यावेळी डोंबिवली पत्रकार संघ २०२१ चे अध्यक्ष संतोष गायकवाड, सचिव श्रीराम कांदु, खजिनदार वासुदेवन मेनन यांसह शंकर जाधव, नरेंद्र थोरावडे आणि आकाश गायकवाड आदी सदस्यांनी सदर कार्यक्रमात उपस्थित राहून शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा परिवहन समितीचे माजी सभापती संजय पावशे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.सन्मानचिन्ह व शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते.
या पुरस्कार सोहळ्यात कोरोनाच्या संकट काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेला सेवा – सुविधा प्रदान करणाऱ्या विविध व्यक्ती/ संस्था -आरोग्य विभाग कर्मचारी, डॉक्टर्स, परिचारिका, सफाई कर्मचारी , गॅस एजेंसी कर्मचारी, बस सेवा प्रदान करणारे- बेस्टचे कर्मचारी, ट्रॅफिक पोलिस, :विष्णुनगर पोलीस स्टेशन कर्मचारी, संत शिरोमणी शीर नामदेव शिंपी समाज,सामाजिक कार्यकर्ते,/ संस्था, गोरखनाथ ( बाळा ) म्हात्रे, संदीप सामंत, अॅड. गणेश पाटील, मनसे पदाधिकारी शर्मिला लोंढे, कैलाश सणस,दानशूर प्रल्हाद म्हात्रे, डॉ.सचिन बोंडे,डॉ. कांचन कुरील,सागर दुबे,पवन म्हात्रे, परेश म्हात्रे,डॉ. प्रदीप भगत,किशोर पाटील,सुकमनी कवडेकर,ओमकार तांबे,आशु सिंह,सुनील शुल्का,कैलास सवाखंडे,प्रकाश नलावडे,अर्जुन देवासी,मयुरेश हरस्कर,संजय कागडा,डॉ.परवेश शिकलकर या कोरोना योद्ध्यांचा सत्कार कोकण एकता प्रतिष्ठानने पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन प्राची गडकरी तर आभार प्रदर्शनाची जबाबदारी भाई पानवडीकर यांनी सांभाळली.