डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा रेल्वेचा पूल अरुंद असल्याने अनेक महिन्यापासून बंद करण्यात आला होता. नवीन पुलाचे काम सुरु असल्याने येथील लिफ्ट बंद करण्यात आलीहोती. येथील नवीन पुलाचे काम तीन –चार महिन्यांपूर्वी पूर्ण झाले होते. मात्र पुलावरील लिफ्ट बंद होती.लिफ्ट बंद असल्याने ज्येष्ठ नागरीक आणि महिलांना पुलाच्या पायऱ्या चढताना आणि उतरताना त्रास होत होता.जनतेला होत असलेल्या या त्रासाबाबत खासदार रेल्वे प्रवासी समन्वय समिती सदस्य कैलास सणस आणि नितीन पवार यांनी लक्ष देत रेल्वे प्रशासनाकडे लिफ्ट सुरु करण्यास पाठपुरावा केला. त्याच्या या प्रयत्नाला यश आले असून गेल्या दोन दिवसांपासून डोंबिवली पश्चिमेकडील फलाट क्र.१ वरील लिफ्ट दुरुस्त करून सुरु करण्यास आली. पूर्वेकडील फलाट क्र.५ जवळील लिफ्ट दुरुस्तीचे काम सुरु असून येत्या दोन ते तीन दिवसात येथील लिफ्ट सुरु होणार असल्याचे सणस यांनी सांगितले. खासदार रेल्वे प्रवासी समन्वय समितीच्या प्रयत्नाबाबत डोंबिवलीकरांनी त्यांचे आभार मानले आहेत.
डोंबिवली रेल्वे पादचारी पुलावरील लिफ्ट सुरु…
March 3, 2021
24 Views
1 Min Read

-
Share This!