गुन्हे वृत्त

मुंब्रा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी : खून झालेल्या अनोळखी इसमची ओळख पटवून ७२ तासात आरोपींना केलं गजाआड

ठाणे : मुंब्रा येथे २७ फेब्रुवारी राजी मित्तल ग्राउंड कडे जाणाऱ्या एम एम व्हली कडील रस्त्याच्या वळणाच्या आतील बाजूस अनोळखी इसमावर धारधार शास्त्राने वार करत जीवे ठार मारल्याचे दिसून आल्याने पोलीस फिर्यादी वरून मुंब्रा पोलीस स्टेशन येथे अन्य कलम द्वारे गुन्हा दाखल करण्यात आला होता.मयताची ओळख पटवून गुन्हेगाराचा शोध घेणे अस आव्हानात्मक काम पोलिसांसमोर होते.

सादर गुन्ह्याचे गांभीर्य पाहून मा.पोलीस आयुक्त ठाणे शहर विवेक फणसाळकर यांनी मयताची ओळख पटवून आरोपी निष्पन करण्यासाठी पोलीस पथकांना सूचना दिल्या होत्या.

सहायक पोलिस आयुक्त , कळवा विभाग ,श्रीमती.नीता पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षणे गुन्हा दाखल झाल्यापासून सातत्याने मुंब्रा व आजूबाजूच्या परिसरात मयत इसमाची ओळख पटवण्यासाठी शोध मोहीम राबवली व अथक प्रयत्नाने मयत इसमसची ओळख पटवली.

मयत व्यक्तीच्या पत्नी व मेव्हनी यांच्या कडे तपासादरम्यान संशयास्पद प्रतिसाद मिळत असल्याने त्यांच्या हालचालीवर बारकाईने नजर ठेऊन अखेर तांत्रिक कौशल्य वापरून मोहम्मद नफिक मोहमद शाफिक-याच्या कडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासमध्ये त्याने मयत इसमची पत्नी रुक्सर अहमद शेख व मेव्हनी–रेश्मा मेहमूद सय्यद शेख यांनी खुनाचा कट रचून मयत इसम दाऊद शेख सिमला पार्क,कौसा यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले.दि.२ मार्च २०२१ रोजी विविध सदर आरोपींना अटक करण्यात आली.

सादर कारवाई मा. श्री.विवेक फनसळकर ठाणे शहर (पोलीस आयुक्त), श्री.सुरेश मेकला,पोलीस सह आयुक्त, श्री.अनिल कुंभारे, अप्पर पोलीस आयुक्त,अविनाश अंबुरे-पोलीस उपायुक्त परिमंडळ-१, नीता पाडवी, सहायक आयुक्त ,कळवा विभाग,वरिष्ठ पोलीस निरीक्षक-मधुकर कड मुंब्रा पोलीस स्टेशन,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामचंद्र वळतकर,सह.,पो.संतोष उगलमुगले,सह. पो.नी. शहाजी शेळके,पो.उप.संजय गळवे,पो.ह.दीपक जाधव,बाळा पालांडे,पो.ना.अमोल यादव,कमलाकर भोये,उमेश राजपूत,तेजस परब,पो.शी.जगदीश गावित,भूषण खैरणार,बाबुराव खरात ,मयूर लोखंडे,अंकुश वैद्य,प्रमोद जमदाडे,अर्जुन जुवाटकर यांनी केले असून पुढील तपास श्रीमती.नीता पाडवी कळवा सहायक आयुक्त करीत आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!