डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची प्रकृती उत्तम राहावी यासाठी डोंबिवली पूर्व येथील शिवमंदिर येथे ईगल ब्रिगेड फाउंडेशन मार्फत ५००१ वेळा महामृत्युंजय मंत्र आयोजन करण्यात आला होते. तसेच मारुतीस्तोत्राचे पठण देखील करण्यात आले. याचे थेट प्रक्षेपण फेसबुकवर लाईव्ह दाखवण्यात आले.या कार्यक्रमाला ईगल ब्रिगेड फाउंडेशनचे संस्थापक विश्वनाथ बिवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंदार लेले, शंतनू सावंत, स्वप्नील महाजन, संजय गायकवाड, योगेश साबळे तसेच गुरुजी राजू लेले व त्यांचे सहकारी उपाध्ये यांनी सहकार्य केले.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उत्तम प्रकृतीसाठी ५००१ वेळा महामृत्युंजय मंत्र
March 4, 2021
17 Views
1 Min Read

-
Share This!