ठाणे, ता ८, मार्च संतोष पडवळ : तन्वी फाउंडेशन, दिवा आयोजित व सौ.ज्योती राजकांत पाटील यांच्या सहकार्याने आज ८ मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्यसाधून ठाणे मनपाच्या दिवा शहरात पहिल्यांदाच जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील अनेक कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला प्रसंगी सदर कार्यक्रमास मराठी अभिनेत्री सौ.मौसमी तोंडवळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदर जगातीक महिलादिन निवडक मान्यवरांच्या व महिलांच्या उपस्थितीत पार पडला. तसेच मुख्य सन्मान हा मुंबई लोकलट्रेनच्या मोटरमन मुमताज यांना शाल श्रीफळ व सन्मानपत्र देण्यात आले.