डोंबिवली ( शंकर जाधव ) : राज्यातील जनतेला सर्व क्षेत्रात उत्तम सेवा मिळावी म्हणून राज्य सरकार बंधनकारक असते. राज्यात शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी असे तीन पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी सत्तेत आले.मात्र हे सरकार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत गंभीर लक्ष देत नसल्याचा आरोप पालकवर्गांनी पत्रकार परिषदेत जाहीरपणे आरोप केला.
सीताबाई के. शहा मेमिरिअल स्कूल विरोधात पालकांनी खिडकळी शिवमंदिर शेजारील सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.यावेळी कॉ.काळू कोमास्कर, ऍड.रामदास वाईंगडे,विलास म्हात्रे,हर्षदा गाडगे,संजय पाटील,नवनाथ पाटील,राम पाटील,सत्यवान पाटील, दिनेश पाटील यांच्यासह शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.यावेळी उपस्थित पालकांनी आपले म्हणणे मांडत खिडकाळी येथील सीताबाई के.शहा शाळेचे मालक तथा मुख्य संचालक हे बेकायदेशीरपणे स्टेट बोर्डाची शाळा बंद करून त्या विद्यार्थ्यांना सिबीएससी शाळेत प्रवेश घेण्यास सक्ती करत आहेत. इतकेच नव्हे तर पालकांकडून जास्त पैशाची मागणी करून पालकांची लुट करण्याचे कटकारस्थान करीत असून या विरोधात सरकारदरबारी संबंधित अधिकारी तसेच मंत्र्यांना निवेदने देऊनही डोळे झाक करत असल्याचा आरोप केला.
यावेळी आगरी समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास म्हात्रे म्हणाले, पालकांनी अनेक वेळेला शाळा व्यवस्थापनाला आपली बाजू मांडली.परंतु शाळा व्यवस्थापन आपली मनमानी करत आहेत.महाविकास आघाडी सरकारकडेही पालकांनी दाद मागितली.मात्र या सरकारनेपालकांच्या मागण्याकडे कानडोळा केला.म्हणून येत्या दहा दिवसांत विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना न्याय मिळाला नाही तर पालकांसह आम्ही आंदोलन करू असा इशारा दिला.
शाळा व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकवर्ग अतिशय भयभीत झाले असून ते मानसिक दबावाखाली आहेत.स्टेट बोर्डाच्या शाळेत बेकायदेशीरपणे ऍडमिशनचे जाहिरपणे बोर्ड लावूनही ऍडमिशन घेणाऱ्या सीताबाई के शहा मेमोरियल, खिडकाळी या शाळे विरोधात ठाणे आयुक्त व शिक्षण अधिकारी कारवाई करत नाहीत. या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी पालकवर्ग आंदोलनाचा पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत.
विधानसभेत मनसे विद्यार्थ्यासाठी आवाज उठवणार..
या पत्रकार परिषदेत मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील हे यासंदर्भात विधानसभेत आवाज उठविणार असल्याचे मनसे विभाग अध्यक्ष दिनेश पाटील यांनी सांगितले कि,मनसे नेहमी जनतेच्या बाजूने उभी राहिली आहे.विद्यार्थ्यांसाठी मनसे शाळा व्यवस्थापनाला जाब विचारेल. लवकरच आमदार पाटील हे पालकांची बैठक घेऊन त्यांचे म्हणने एकूण त्यांना न्याय मिळवून देतील.