डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली पूर्वेकडील टिळक चौकाजवळील पटेल भुवन या अतिधोकादायक इमारत पालिका प्रशासनाच्या `फ`प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांच्या देखरेखीखाली कामगारांनी जमीनदोस्त केली. तळअधिक तीन मजली या ४० वर्ष जुन्या इमारतीतील रहिवाश्यांना प्रशासनाने भोगवटा पत्र दिले होते.तर इमारतीच्या दुकानदारांना यापूर्वीच दुकाने रिकामी करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.दुकाने रिकामी झाल्यावर पालिकेने जेसीबीच्या सहाय्याने इमारती तोडली. या इमारतीत काही रहिवाशी पागडी पद्धतीने तर काही रहिवाशी ओनरशिप पद्धतीने राहत होते.
अतिधोकादायक इमारतीत जमीनदोस्त ..
March 15, 2021
21 Views
1 Min Read

-
Share This!