वसई : वसईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. NGO च्या नावाखाली फोनवर संपर्क करुन आरोपी महिला सेक्स रॅकेट चालवत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. वसईतील कृष्णा टाऊनशीप या हायप्रोफाईल परिसरात आरोपी महिला सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला मिळाली. त्यानंतर रात्री ९ वाजता खोटे गिऱ्हाईक पाठवून या सेक्स रॅकेटचा भांडाफोड करण्यात यश मिळवले आहे.
दोघींची_सुटका_आरोपी_महिलेला_बेड्या
या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. एका आरोपी महिलेला अटक करण्यात आले आहे. नालासोपारा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून ही कारवाई केली आहे.