महाराष्ट्र

दुर्गम भागातील नागरिकांच्या लसीकरणासाठी आवश्यक सुविधा द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत धडगाव येथे जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन

नंदुरबार दि.19 : जिल्ह्याच्या दुर्गम भागातील नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी आवश्यक सर्व सुविधा योग्य प्रकारे मिळतील याकडे विशेष लक्ष देण्यात यावे आणि लसीकरणानंतरदेखील नागरिकांनी मास्कचा वापर आणि शारीरिक अंतराचे पालन करावे यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात यावीअसे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

धडगाव येथे आयोजित जिल्हा आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीस आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवीकृषिमंत्री दादाजी भुसेराज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटेआरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यासजि.प.अध्यक्ष ॲड.सीमा वळवीआमदार मंजुळा गावितविभागीय आयुक्त राधाकृष्ण गमेविशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकरमाजी आमदार चंद्रकांत रघुवंशी,  जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुडमुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडेपोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत आदी उपस्थित होते.

श्री. ठाकरे म्हणाले,  शहरी भागात आरोग्याच्या सुविधा उपलब्ध असतात. परंतु ग्रामीण आणि विशेषत: दुर्गम भागातील नागरिकांना अशा सुविधा मिळणे आवश्यक आहे. कोविडचा धोका पुन्हा वाढला आहे. मात्र यावेळी एक ढाल म्हणून लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. लसीकरणाबाबत जनतेच्या मनातील शंका दूर करून लसीकरणाचा वेग वाढवावा. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वत्र पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे.  जिल्ह्याने जनजागृतीचे चांगले उपक्रम राबविले असून त्यात यापुढेही सातत्य ठेवण्यात यावेअसे त्यांनी सांगितले.

तोरणमाळ पर्यटन विकास आराखडा तयार करा

तोरणमाळ पर्यटन विकासाचा सूक्ष्म आराखडा तयार करावापर्यटन विकासाच्या माध्यमातून येथील रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी शासन सर्व सहकार्य करेलअसे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.  विकास आराखडा तयार करताना प्राधान्यक्रम ठरविण्यात यावा. परिसरात पळसाची झाडे रांगेत लावण्यासारख्या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या संकल्पना राबवाव्या. लवकरच पर्यटनमंत्र्यांसमवेत याबाबत बैठक घेण्यात येईलअसे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री. पाडवी म्हणालेजिल्ह्यात फळबाग लागवड कार्यक्रम राबविल्यास 200 डोंगर हिरवे होतील.  त्यासाठी ग्रामपंचायतीचा सहभाग घेता येईल. जिल्ह्यातील आश्रमशाळांमधून सॅटेलाईट एज्युकेशन राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात मनरेगाच्या माध्यमातून यावर्षी विक्रमी फळबाग लागवड झाल्याचे कृषिमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

विभागीय आयुक्त श्री.गमे यांनी विभागातील कोरोना परिस्थितीची तर जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती दिली.

धडगाव येथे लसीकरणाचा आढावा

मुख्यमंत्र्यांनी धडगाव ग्रामीण रुग्णालय येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन कोरोना लसीकरणाची माहिती घेतली. त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. कोरोना प्रतिबंधासाठी नागरिकांना मास्क घालून शारीरिक अंतराचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले त्यांनी परिचारिकाच्या कामाचे कौतुकही यावेळी केले.

फळरोप वाटिकेची पाहणी

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी बैठकीनंतर कृषि विभागाच्या फळरोप वाटिकेची पाहणी केली. कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी पारंपरिक पद्धतीने धनुष्यबाण देऊन त्यांचे स्वागत केले.  श्री. ठाकरे यांनी रोपवाटिकेबाबत समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील नागरिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी फळबाग लागवड महत्त्वाची ठरेल. त्यादृष्टीने जिल्ह्यासाठी आणखी फळबाग रोपवाटिका तयार करण्यास शासन सहकार्य करेल असे त्यांनी यावेळी सांगितले. सीडबॉल तयार करून ते अधिक पाऊस असलेल्या भागातील उजाड डोंगरावर टाकण्याचा कार्यक्रम राबवावाअशी सूचना त्यांनी केली.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी लसीकरणाबाबत दुर्गम भागातील जनतेला दिला विश्वास

मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन लसीकरणाची माहिती घेतली. त्यांनी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी चर्चा केली.  दुर्गम भागातील माझ्या माताभगिनी आणि बांधवाना कोरोना लसीकरणाची चांगली सुविधा मिळते का हे पाहण्यासाठी मोलगी येथून लसीकरण केंद्राच्या भेटीला सुरुवात करीत आहे असे त्यांनी सांगितले. ते म्हणालेलस घेताना कोणतीही भीती मनात बाळगू नका. कोरोनाचे संकट वाढत असले तरी सर्वांनी निश्चय केल्यास त्यावर मात करता येईल. लस घेतल्यानंतरही मास्कचा वापर आणि शारीरिक अंतराचे पालन सुरू ठेवा. आपण स्वतः लस घेतली असून त्याचा कोणताही परिणाम होत नसल्याने  घाबरू नकाअशा शब्दात त्यांनी लसीकारणासाठी आलेल्या नागरिकांना विश्वास दिला. श्री.ठाकरे यांनी लसीचा साठा करण्यासाठी पुरेशी व्यवस्था व शितपेटीसाठी आवश्यक विद्युत व्यवस्थेविषयी माहिती घेतली. त्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लसीकरण प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्यांनी पोषण पुनर्वसन केंद्राला भेट देऊन कुपोषित बालकांवर करण्यात येणाऱ्या उपचारांची माहिती घेतली.

यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी ग्रामीण रुग्णालय परिसरात मांडण्यात आलेल्या रानभाज्यांची आणि सातपुड्यातील पारंपरिक पिकांची माहिती घेतली.  त्यांनी रानभाज्या पिकविण्याऱ्या आदिवासी बांधवांशी संवाद साधला आणि पारंपरिक वाणाचे संवर्धन केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.  रानभाज्यांना बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येईलअसे त्यांनी सांगितले.

तोरणमाळ विद्युत उपकेंद्रासाठी सहकार्य करणार

मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी धडगाव तालुक्यातील सुरवणी विद्युत उपकेंद्राच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. त्यांनी कामाबाबत समाधान व्यक्त केले आणि उर्वरित काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. काम पूर्ण करण्यासाठी शासन सर्व सहकार्य करेलदुर्गम भागातील वीजेची समस्या दूर करण्यासाठी तोरणमाळ येथील विद्युत उपकेंद्रासाठी 16 कोटींचा प्रस्ताव पाठविल्यास त्यासाठीदेखील सहकार्य करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

हे उपकेंद्र पूर्णत्वास आल्यास अक्राणी अक्कलकुवा व परिसरातील 200 गावे व साधारण 11 हजार ग्राहकांना याचा लाभ होणार आहे.  या उपकेंद्रातून 33 के.व्ही. दाबाने धडगांवहातदुईमोलगीजमानाकाकरदापिंपळखुटा या गावांना वीजपुरवठा करण्यात येणार आहे.  सद्यस्थितीत अक्राणी व अक्कलकुवा तालुक्यातील 220 गावांना शहादा उपकेंद्रातून वीज पुरवठा होत आहे. या उपकेंद्रामुळे 33 के.व्ही. वाहिनीची लांबी कमी होणार असून त्यामुळे या भागातील भविष्यात येणारी वीजेची मागणी पूर्ण करण्यासाठी हे केंद्र महत्वपूर्ण ठरणार आहेअशी माहिती यावेळी देण्यात आली.

मुख्यमंत्र्यांचे मोलगी येथे स्वागत

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी हॅलिपॅडवर आगमन झाले. आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी  आणि कृषिमंत्री दादाजी भुसे  यांनी त्यांचे स्वागत केले.  त्यांच्यासमवेत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि आरोग्य सचिव प्रदीप व्यास होते.

ॲड. पाडवी यांनी सातपुड्यातील डाब येथील स्ट्रॉबेरी मुख्यमंत्र्यांना भेट दिली.  प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आणि जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार मंजुळा गावीतविशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकरमाजी मंत्री पद्माकर वळवीमाजी आमदार चंद्रकांत रघुवंशीमुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडेपोलीस अधीक्षक महेंद्र पंडीतआमश्या पाडवी आदी उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!